दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : येथील वारकरी संप्रदायातील उच्चशिक्षित समाजप्रबोधनकार महीला किर्तनकार हभप डॉ.धर्मश्री शेवाळे यांना आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकात्मता वारकरी संप्रदाय संस्थेच्या वतीने किर्तनरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.सदर पुरस्कार महाराष्ट्र वारकरी मंडळ कोकण प्रांताचे अध्यक्ष भगवान महाराज कोकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश महाराज सुतार,किरण सामंत, संजय आग्रे, विलास साळसकर, संतोष गिरकर, बाळकृष्ण कुरटे, काशिनाथ वाणे तसेच वारकरी संप्रदायातील महाराज,वारकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
हभप डॉ.धर्मश्री शेवाळे या उच्चशिक्षित आहेत, त्यांनी संस्कृत विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त केली असून वारकरी संप्रदायाचे लहानपणापासूनच त्यांच्या मातोश्री हभप मंदाताई शेवाळे यांच्या कडूनच बाळकडू मिळाले आहे, कीर्तन – प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य गेली अनेक वर्ष ते करत आहेत, समाजप्रबोधनातून त्यांनी स्त्री शिक्षण, स्त्रीभ्रूणहत्या, शेतकरी वर्ग, युवावर्ग याविषयावर किर्तनातून प्रबोधन केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकात्मता वारकरी संप्रदाय संस्थेच्या वतीने किर्तनरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश महाराज सुतार यांनी सांगितले आहे.