धानोरा/ भाविक करमनकर
धानोरा तालुक्यातील पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव येथे जिल्हा पोलीस प्रशासन तर्फे दोन दिवसीय आधार कार्ड कॅम्प घेऊन नागरिकांना आधार कार्ड बनवून देण्यात आले.
सविस्तर वृत्त शासना तर्फे विविध सरकारी योजना साठी आधार कार्ड जरुरी असल्याने आधार कार्ड अपडेट असणे जरुरी आहे ही बाब लक्षात घेता आणि मुरूम गाव अति संवेदनशील असल्यामुळे परिसरातील नागरिकांना पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव यांच्या तर्फे आधार कार्ड कॅम्प घेऊन आधार कार्ड काढून देण्यात आले यावेळी मुरूम गाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी जि.एन. आठवे
तालूका पत्रकार मो.शरीफ भाई कूरैशी उपनिरीक्षक गोगंले, पोलीस उपनिरीक्षक जारवल, दूगा मेजर,उसेंडी मेजर,आधार कार्ड केन्द्र ऑपरेटर संदीप किरमीरे गडचिरोली,सहयोगी प्रियंका सोनवणे, ऑपरेटर सिजनसिगं भक्त उपस्थित होते.
यावेळी मुरुमगाव परिसरातील अतिसंवेदनशील भागातील मौजा हिरंगे ग्रामपंचायत, सिदेंसूर, मुरुमगाव पन्नेमारा ग्रामपंचायत तूमळीकसा गोटाटोला व महिला बचत गट मुरुमगाव, व शालेय विद्यार्थी चे आधार कार्ड बनवून देण्यात आले.
या मध्ये आभा कार्ड 102, आयुष्यमान कार्ड 58, ईश्रम कार्ड 120 व आधार कार्ड 120 या प्रमाणात नविन कार्ड बनवून देण्यात आले.