कमलसिंह यादव
प्रतिनिधी कन्हान/नागपूर
कन्हान :-
शनिवारी रात्रोला कोल वसारी समोर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळपासून पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला.
वराडा परिसरात कोल वसारी यांचा प्लांट आहे.जेथे कोळसा पाण्याद्वारे स्वच्छ केला जातो.वासरी बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात जल व वायू प्रदूषण होत आहे.
वराडा,एसंभा,घाटरोहणा,बखारी सह अनेक गावांच्या शेतकऱ्यांची 600 एकर शेती उद्ध्वस्त होत आहे. त्यांनी 24 तारखेपासून कोल वसारीसमोर धरणे आंदोलन केले होते आणि कोळसा उत्खनन बंद करण्यात आले.
24 रोजी दुपारी 1:30 वाजता आंदोलन करणाऱ्या 20 शेतकर्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस वाहनात बसवून नगर परिषदेच्या नवीन इमारतीत आणण्यात आले.त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
यामुळे 25 डिसेंबर रोजी सकाळपासून वराडा सरपंच विद्या दिलिप चिखले यांच्या नेतृत्वाखाली महिला व पुरुष शेतकरी पोलीस ठाण्यात जमा होऊ लागले.कोळसा वसारीतून आणलेल्या शेतकऱ्यांना सोडण्याची मागणी करत कोळसा वसारीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते.
दरम्यान,”जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार, माजी आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी,काँग्रेस नेते चंद्रपाल चौकसे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे,पंचायत समिती सभापती मंगला उमराव निंबोण नरेश बर्वे,व्यक्ट कारेमोरे जि प सदस्य,सिताराम पटेल भारव्दाज यांच्यासह बखारी,गोंडेगाव,एसभा,जुनी कामठी,घाटरोहणा,वराडा गावातील शेतकरी येथील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वराडा,येसंबा,निलज,बखारी घाटरोहणा,नांदगाव आदी गावातील सरपंचांनीही धरणे आंदोलनाला पाठिंबा देत पोलीस ठाणे गाठले.वाढता दबाव पाहून दुपारी चार वाजता आणलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही कार्यवाही न करता सोडले.
उल्लेखनीय आहे की,22 रोजी वरडा सरपंच विद्या दिलिप चिखले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कोळ वसारीसमोर धरणे आंदोलन केले.ज्यामध्ये सावनेरचे आमदार सुनील केदार,सरपंच संघाचे अध्यक्ष चंद्रपाल चोकसे,जय जवान जय किसान अध्यक्ष प्रशांत पवार, सिताराम पटेल सह अनेक नेते मंडळी मोठे सख्येत उपस्थित होते.