जांभुळघाट येथे जुनी परीवार तर्फे,५५५ वी गुरुनानक देव जी (जयंती) प्रकाश पर्व उत्साह संपन्न..

दामोधर रामटेके 

कार्यकारी संपादक 

  चिमूर : – चिमूर तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथे जुनी परिवारातर्फे दर वर्षी प्रमाणे यंदाही गुरु नानक देवजी चा ५५५ वा प्रकाश पर्व मोठ्या उत्साहाने आज साजरा करण्यात आला. 

        या दिवशी धन-धन गुरु नानक देवजी महाराज यांच्या शिकवणी विषयी माहिती दिली जाते.

       गुरू ग्रंथ साहिब सुखमनी पाठ केल्या जात असते.तसेच शिख पंथाचे प्रथम गुरू नानक देवजी महाराजाचे सर्वत्र गुरू प्रकाश पर्व (जयंती) मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत असते. 

       दरवर्षी प्रमाणे आज या जयंती निमित्त जांभुळघाट येथील समूह सात संगत एकत्रीत येत असते.यावेळे सुखमनीचा पाठ केला जातो.नंतर अरदास व गुरूनान देव जी महाराज यांच्या शिकवण व देव रूपी माहीती दिली जाते.

        या विषयी कमी वेळेत पाट्टी स.गुरुदेवसिंग दुधानी,(गडचिरोली)स.जीतसिंग जुनी (नागपुर),स.रतनसिंगअंर्धेंले (वाहनगाव) यांनी मोलाची माहीती दिली.

        काही व्यक्तीचे सत्कार करण्यात आले व यानंतर कार्यक्रमाचे आभार स.अदबसिंग जुनी यांनी केले.

          मुख्य कार्यकार्यक्रमाची सांगता होताच लंगर (महाप्रसाद) चा कार्यक्रम करण्यात आला.स्थानिक ग्रामवासिय बंधू,महिला भगिनीं दरवर्षी या उत्साहाप्रसंगी एकत्रित येऊन सहभागी होत असतात.