राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात संविधान दिवस साजरा…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर-/स्थानीक गांधी सेवा शिक्षण द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. 

              या कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समितेचे सदस्य श्रीहरी गोहने व प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल बन्सोड होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमात उद्देशिकीचे वाचन करण्यात आले.

           कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीहरी गोहने यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले की, ‘ संविधान ही देशाची ओळख आहे’. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून देशाची राज्यघटना साकार झाली आहे. संविधानाची जपणूक प्रत्येकानी करायला हवी.

            वक्ते डॉ.प्रफुल बन्सोड म्हणाले की, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना मंजूर झाली, म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो’.संविधान सर्वोच्च कायदा असतो. ते देशाच्या राजकीय व्यवस्थेची व्याख्या करते. संविधानाची तत्वे प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणली पाहिजे. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात २६/११/२०११ रोजी मुंबई येथील ताजमहल होटेलमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहिद झालेले जवान तसेच मृत झालेल्या निरपराध जनतेच्या स्मरणार्थ श्रद्धांजली अर्पण केली.

           कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मंचावर प्रा. डाॅ कार्तिक पाटील प्रा. डाॅ.हरेश गजभिये, डॉ.प्रफुल राजुरवाडे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राकेश कुमरे उपस्थित होते.

              विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. राजेश्वर राहागंडाले यांनी प्रास्ताविक केले. संचालन प्रा.निलीमा तुरानकर आभार प्रा. गजानन चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.