युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
दर्यापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणावर आता एक धक्कादायक वळण घेत आहे. अभिषेक गावंडे, जिल्हा अध्यक्ष, मा.अ.का. महासंघ, अमरावती जिल्हा यांनी दर्यापूर अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गावंडे यांच्या तक्रारीनुसार, सूचना फलकांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसे काढले गेले आहेत आणि करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. त्यांनी या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनंतर, संबंधित प्रकरणाची तपासणी कार्यकारी अभियंता दर्यापूर यांच्या कार्यालयाकडे दिली गेली, जे स्वतः या भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अभिषेक गावंडे यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापनेची मागणी केली आहे. त्याचबरोबर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तपासणी सोपवली जावी, अशी मागणी केली आहे.
गावंडे यांनी या प्रकरणावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी चेतावणी दिली आहे की, पंधरा दिवसांत योग्य कार्यवाही न झाल्यास, ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करतील. यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे.
“न्याय मिळवण्यासाठी मी कुठेही थांबणार नाही!” अशा ठाम भूमिकेने गावंडे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांचा इशारा आणि मागणी प्रशासनाच्या व संबंधित अधिकाऱ्यांसाठी गंभीर धक्काच ठरला आहे.
आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यवाहीवर सर्वांच्या नजरा असतील.
प्रतिक्रिया
माझ्या तक्रारीवर योग्य कार्यवाही न झाल्यास मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे. पंधरा दिवसांच्या आत कार्यवाही न केल्यास मी माझा ठराव पूर्णपणे राबवणार आहे. माझ्या हक्कांसाठी आणि समाजाच्या हितासाठी मी कुठेही थांबणार नाही.”