
युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
नजिकच्या गौरखेडा चांदई येथे विद्यार्थी पालकांची पालक सभा नुकतीच पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमित कुमार वानखडे हे होते याप्रसंगी तथागत भगवान बुद्ध महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालक सभेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती व अभ्यासाबाबत चर्चा केली अनेक पालकांनी आपले पाल्य विद्यालयात शिकत असल्याबाबत समाधान व्यक्त केले व येथील शिक्षकाकडून विद्यार्थ्यांच्या सर्वतोपरी प्रगतीसाठी येथील शिक्षक खूप मेहनत घेतात त्याबाबत शिक्षकांचे अभिनंदन केले.
विद्यार्थी लाभाच्या योजना विविध शिष्यवृत्ती योजना अतिशय चांगल्या रीतीने राबवल्या जातात की नाही यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.
शासन स्तरावून निर्देशित केलेल्या आयडी संदर्भात मुख्याध्यापकांनी पालकांना सविस्तर माहिती दिली व प्रत्येक विद्यार्थ्याच्या अपार आयडी जनरेट करणे अतिशय महत्त्वाचे आहे यासाठी पालकांनी संमती पत्र भरून द्यावे असे सांगितले याबाबत पालकांनी होकार देऊन संमती दिली.
यावेळी पालक सभेचे प्रास्ताविक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दिपक कावरे तर सूत्रसंचालक आणि आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक अमोल बोबडे यांनी पार पाडले.
यावेळी गौरखेडा,लांडी खिरगव्हाण,घडा,सांगवा,बेंबळा,रामगाव,कोळंबी,माटरगाव,चांदई,मोचर्डा,शिवार खेडा,येथील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालक सभेला यशस्वी करण्याकरिता विद्यालयाचे साहाय्य शिक्षक प्रशांत वानखेडे,दिपक कावरे,वासुदेव भांडे,पूरन प्रकाश लव्हाळे,मनिषा गावंडे,चित्रा राऊत,दिपक रहाटे,आनंद खंडारे,संजय आठवले,यांनी उपस्थित राहात विशेष परिश्रम घेतले.