युवराज डोंगरे/खल्लार
26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून सर्वत्र साजरा केल्या जातो. याच दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी, दर्यापूरच्या वतीने संविधानाची प्रास्ताविक दर्यापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार विनायक लंबे,पि एस आय नितनवरे यांना भेट देण्यात आली.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी जिल्हाध्यक्ष अंकुश वाकपांजर, वंचित बहुजन आघाडीचे दर्यापूर शहराध्यक्ष डॉ. महेंद्र कांबळे, शहर सचिव नागोरावजी मोहोड, सुमित खंडारे, प्रदीप चक्रनारायण, यश कांबळे, अनिकेत सदाशिव, यश चौरपगार, सुदर्शन गवई, कार्यकर्त आणि पदाधिकारी उपस्थितीत होते.