ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :–येथील संताजी प्रशासकीय महाविद्यालय तथा श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालय आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात 26 नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा करण्यात आला सदर संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ’ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य फाल्गुन नरुले तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक दौलत धोटे प्रा, गोपाल दोनाळकर प्रा, शरद समर्थ प्रा,क विशाल रंगारी तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा, मोहन रामटेके प्रा सुधीर ठेंगरी सचिन खेडकर प्रा संदीप दोनाडकर , व इतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते. संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देताना प्राचार्य नरुले म्हणाले या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्त्व।चा असा संविधान दिला या ग्रंथाच्या माध्यमातून भारत देशाची वाटचाल सुरू आहे या ग्रंथाचे वाचन विद्यार्थ्यांनी करावे व त्यानुसार आपले आचरण करावे असे आवाहन केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक दौलत धोटे प्राध्यापक गोपाल दोनाडकर प्राध्यापक विशाल रंगारी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांमधून संविधानाचे महत्त्व दीपिका नागापुरे प्रेरणा गडमडे कुमारी बांबोडे यांनी विद्यार्थ्यांसमोर सांगितले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक प्रमोद नैताम यांनी केले प्रस्ताविक प्राध्यापक विशाल रंगारी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक मोहन रामटेके यांनी मानले, संविधान दिनाच्या कार्यक्रमाला संताजी प्रशासकीय महाविद्यालय तसेच श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालय येथील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.