प्रतिनिधी//प्रलय सहारे

 

वैरागड : – येथील अंगणवाडीत अनेक दिवसापासून बाल विकास प्रकल्प अंतर्गत पोषण आहाराचा पुरवठाच झालेला नसल्यामुळे लहान बालके आहारापासून वंचित झालेले आहे. त्वरित पोषण आहाराचा पुरवठा करावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा माजी आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर यांनी दिला आहे.

 

बाल विकास प्रकल्प अंतर्गत प्रत्येक अंगणवाडीत पोषण आहाराचा पुरवठा होत असते. पोषण आहाराच्या माध्यमातून बालकांना खिचडी, उसळ आणि सोजी सारखे पोषण आहार दिल्या जाते. येथील अंगणवाडीत अनेक दिवसापासून पोषण आहाराचा पुरवठा होत नसल्याने माजी आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर यांनी अंगणवाडी क्र. १८ येथे भेट देऊन पोषण आहाराची माहिती घेतली. 

 

लहान बालके अनेक दिवसापासून पोषण आहार पासून वंचित असल्याने त्वरित पोषण आहाराचा पुरवठा करावा अन्यथा बाल विकास प्रकल्प कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा माजी आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर यांनी दिला आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com