पारशिवनी प्रतिनिधी :- वाहनाच्या धडकेमुळे एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.ही घटना शुक्रवारी दुपारी मनसर ते माहुली रस्त्यावर घडली.

      चेतन गणेश कुंभरे( २५, राहणार दाहोदा, भट्टीटोला, तालुका रामटेक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.मनसर ते माहुली रस्त्यावर डोलामाईन शिवारात एक युवक मृतावस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला लोकांना आढळून आला.

    माहुलीचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर बिऱ्हो यांनी अपघाताची माहिती पारशिवणी पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीकरिता पारशिवणी येथील ग्रामिण रुग्णालयात आणला.

     मृतक चेतन कुंभरे याला अज्ञात वाहनाने जोरात धडक देऊन ते वाहन पळून गेले.घटनेचा तपास पारशिवणी पोलीस करीत आहे.

    पारशिवनी तालुक्यातील माहूली ते मनसर रोडवरील  डोलामाईन शिवारात २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. 

    चेतन गणेश कुंभरे वय २५ वर्षे रा.दाहोदा (भट्टीटोला) ता.रामटेक असे मृतकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार हकिकत अशी आहे की,मृतक चेतन हा घटना वेळी दरम्यान माहूली कडून मनसर दिशेने विना नंबरच्या मोटारसायकलने जात होता.तेवढ्यात मागून एक  मोठे अज्ञात वाहन अतिजलद गतीने आले व नकळत केतनला जबरदस्त धडक दिल्यामुळे केतनचा जागीच पडून मृत्यु झाला. 

    कोणाचातरी अपघात झाला असल्याचे वाहतूक दारांना दिसून आले.हि माहिती कळताच माहूलीचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर बिरो घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती पारशिवनी पोलसात दिली. तेव्हा पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले.अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com