बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
2024 च्या इंदापूर विधान सभेसाठी माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचा उमेदवारी अर्ज अजितदादा पवार यांच्या उपस्थित दाखल केला.
या प्रसंगी इंदापूरच्या जुनी मार्केट कमिटी येथे जनसमुदाया समोर संबोधित करीत आसताना अजितदादा पवार म्हणाले की,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझ्याशी गोड बोलून तीनशे कोटी रुपये इंदापूरसाठी आणले, ते तीनशे कोटी रुपये गेले कुठे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेतून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सवाल केला.
इंदापूर तालुक्याला सहा हजार कोटी रुपयांचा विकास निधी अवघ्या तीन वर्षांत दिला असून, आणखीन विकास करण्यासाठी खोट्या-नाट्या प्रचाराला बळी न पडता रात्री बाराला जरी माझी गरज लागली, तर मी तुमच्या पाठीशी आहे, हा शब्द देतो. 22 गावचा पाणी प्रश्न सोडवायचा आहे. कुठून कसं पाणी आणायची जबाबदारी माझी आहे. मात्र, आमदार दत्तात्रय भरणे यांना तिसऱ्यांदा आपली सेवा करण्यासाठी विधानसभेत माझ्याबरोबर पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.
इंदापूर येथे आमदार दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलत होते.
लोकसभेला अदृश प्रचार केला…
लोकसभा निवडणुकीत आम्हाला घरी जेवायला घातलं आणि निवडणुकीच्या निकालानंतर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही आमच्या विरोधी गटात सहभागी होताच लोकसभेला आम्ही अदृश प्रचार केला, अशी जाहीर कबुली..
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे, ज्येष्ठ नेते प्रशांत पाटील, ज्येष्ठ नेते दत्तामामा घोगरे, संचालक महादेव घाडगे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, युवक जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरीक्षक संग्राम पाटील, कार्य अध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे, संचालक श्रीकांत बोडके, धिरू पाटील, भैया कोकाटे, जगदीश सुतार,तुकाराम घोगरे, नरहारी काळे, पांडुरंग डीसले, दादासाहेब शिरसागर, संतोष सुतार, सुदर्शन बोडके ,नितीन सरवदे, सोमनाथ मोहिते, श्रीकांत दंडवते, बबन बोडके, महावीर जगताप, सचिन मोहिते, विक्रम मोहिते, पांडुरंग मोहिते, नाथा रुपनवर, सुनील पालवे ,दादा सोलंकर, नेताजी पवार, पांडूदादा बोडके, दत्तात्रय शेंडगे, नामदेव क्षीरसागर, राजेंद्र जगताप, विलास सूळ, प्रशांत बंडगर, अरुण क्षीरसागर, गोविंद सुळ, विद्यासागर वाघमोडे, उस्मान शेख, सुनील जगताप, नूर मुहम्मद शेख , शब्बीर काजी, प्रवीण बोडके, महेश बोडके, सह तालुक्यातून आदी मान्यवर व ग्रामस्थ आजी-माजी सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष तसेच तरुण कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते.