वडिलांनी घेतलेल्या शेतजागेवर वारसांना केले बेदखल… — तात्कालीन तहसीलदाराचा महाप्रताप..

 

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

 चिमूर :- तालुक्यातील दाबका हेटी येथील शेतजमिन हरी पराते,हुमा पराते व बापुना पराते यांनी १९६० साली खरेदी केली होती.या शेतीचे १९६५ मध्ये आपसी हिस्से करण्यात आले. मात्र,माझाच हिस्सा असल्याचे सांगुन व प्रशासनाशी संगनमत करून चुलत बहिणीच्या मुलाने आपले नाव ७/१२ उताऱ्यावर चढवुन यातील खऱ्या वारसांना बेदखल केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत पराते बंधुनी केला आहे.

        चौसष्ठ वर्षापुर्वी वडील व त्यांच्या भावांनी घेतलेल्या,”शेतजमीनीच्या मालकी हक्क करीता, शासन-प्रशासनाचे उंबरठ्यावर खेटा झिजवणारे आणि मुळ वस्ती दाबका हेटी येथील रहिवासी असणारे देवराव बापुना पराते सध्या चंद्रपूर येथे राहतात.

          दाबका हेटी येथील वामन उमाजी पराते यांनी चिमूर येथे पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत,”रंगनाथ नंदनवार भिसी,यांनी त्यांच्या आईच्या वारसान हक्काने मिळालेल्या शेतजमीनी सोबतच देवराव पराते व वामन पराते यांना वारसान हक्काने मिळणाऱ्या शेतजमीनवर तलाठी,तहसीलदार यांना खोटी माहिती देऊन अतिक्रमण केले सदर शेतजमिनीवर पिक घेत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला.

          शेतजमीन प्रकरण विभागीय आयुक्तांकडे असताना त्यांनी देवराव पराते यांच्या बाजुने निकाल देत प्रकरण पुन्हा चिमूर तहसीलदार यांचेकडे २००३ मध्ये चौकशी करीता दिले होते असे पत्रकार परिषदेत सांगितले.

           आयुक्ताच्या आदेशाला फिरवुन तत्कालीन तहसीलदारांनी रंगनाथ नंदनवार यांचे बाजुने निर्णय दिला होता. हा खऱ्या वारसानावर अन्यायच होता.

       मात्र,आमच्याकडे असलेला असलेला १९६० चा पुरावा ग्राह्य धरला नाही.त्यामुळे या प्रकरणाची सखोल फेर तपासणी करावी तथा पुराव्यांची शहनिशा करून आम्हाला वारसान हक्काने मिळणारे हक्क मिळवुन देण्याची मागणी देवराव पराते व वामन पराते यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन केली.