शिवसेना प्रमुख श्री.उध्दवराव ठाकरे जागरुक व सतर्क,ते जनतेला धोका देणार नाहीत… — भाजपा जनविरोधी पक्ष? — इतर….

 संपादकीय

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

              शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री.उध्दवराव ठाकरे यांची महाराष्ट्र व देशाच्या जनतेप्रती,” गुलाम व लाचार मुक्त परिभाषा,सरळ आणि रोखठोक असल्याने ते जागरुक व सतर्क असल्याचे प्रतीत होते.

               महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना वारंवार सावध करण्यासाठी त्यांनी आखलेल्या संघर्ष यात्रा व त्यातंर्गत सभांची कार्यपद्धत महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना,”भाजपाच्या व त्यांच्या मित्र पक्षाच्या,”काम कमी व बळबळ जास्त,अशा भावनात्मक विळख्यातून बाहेर काढण्यासाठी महत्वपूर्ण ठरल्यात. 

              याचबरोबर भाजपाच्या केंद्र सरकारची आणि महाराष्ट्र राज्यातील शिंदे-भाजपा सरकारच्या अनेक घडामोडींची व धोरणांची पोलखोल करीत महाराष्ट्रातील जनतेपुढे त्यांची बोंबाबोंब कार्यपद्धत उघडकीस केली.शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,आमदार भास्कर जाधव व उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी तर शिंदे-भाजपा सरकारचा बुरका फाडत चांगलेच फैलावर घेतले आणि त्यांच्या अनागोंदी बोलण्यातील हवाच काढली.

       उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्यासह शिवसेनेच्या महिला पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्यातील स्त्रियावरील अत्याचाराचे वास्तव्य पुढे आणित गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीच्या वाभाड्याचे खरे चित्रन महाराष्ट्र राज्यातील जनतेसमोर रेखाटले.

             उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी तर केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या बऱ्याच धोरणावर कायदेशीर बोट ठेवले आणि कायदेशीर परिभाषेत त्यांच्या धोरणांची स्पष्टता जनतेला सांगीत भाजपाच्या नौटंकीची चिरफाड केली.(उदा.समान नागरिक कायद्याचे खरे वास्तव्य व इतर.)

              शिवसेना प्रमुख उध्दवराव ठाकरे,खासदार संजय राऊत,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,आमदार भास्कर जाधव,उपनेत्या सुषमाताई अंधारे व महाराष्ट्र राज्यातील शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचा सतर्कपणा तात्काळ ठोस उत्तर देणारा असल्यामुळे ते सर्व महाराष्ट्र राज्यातील जनतेचे रक्षण व संरक्षण करीत आहेत असे म्हणणे अनुचित ठरणारे नाही.(यात वंचित बहुजन आघाडी,दलित पँथर,कांग्रेस,राष्ट्रवादी कांग्रेस,बसपा,यांचा सुध्दा महत्वपूर्ण कार्यभाग आहे असे मी मानतो‌‌.)

             मात्र,शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे,”यांचा” पत्रकार परिषदातंर्गत कायदेशीर परिभाषेचा भर राहात असल्याने महाराष्ट्र राज्यातील सत्ता पक्षाचे प्रमुख,त्यांचे खासदार व आमदार यांना महाराष्ट्र राज्यातील जनतेंला मुर्ख बनविने डोईजड झाले आहे.

           यामुळे ते सुषमाताई अंधारे यांना अळचणीत आणण्यासाठी अडगळीत प्रयत्न करीत असावेत हे नाकारता येत नाही.मात्र शिवसेना प्रमुख उध्दवराव ठाकरे यांचे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकाच्या घडामोडीवर तिक्ष लक्ष राहात असल्यामुळे भाजपा-शिंदे सरकारला सुषमाताई अंधारे यांना विनाकारण अळचणीत आणता येणारे नाही हे सुध्दा तितकेच खरे आहे.

            माजी मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष,”हा,तात्काळ उत्तर देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे विनाकारण फालतू बोंबा ठोकणाऱ्यांचे मार्ग बऱ्याच अंशी बंद झालेले दिसतात.

             भाजपा खुल्लेआम बहुजन विरोधी व जनविरोधी पक्ष आहे हे त्यांच्या अनेक धोरणावरुन लक्षात येतय.हा पक्ष एखादे धोरण आखते व ते जनतेच्या हिताचे नसतांना जनतेच्या हिताचेच आहे असे भासविण्यासाठी प्रचार तंत्राचा खूप उपयोग करते,तेव्हा दिसून येते‌ की,या पक्षाला जनतेच्या हितासी व सुरक्षेसी काळीमात्र काहीही संबंध नाही.

          भाजपचे नेतृत्व जर लोककल्याणकारी असते तर सरळसरळ भारतीय संविधानानुसार त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले असते आणि भारतीय संविधानाला अनुसरून जनहिताची धोरणे प्रभावीपणे राबविली असती.पण,त्यांच्याकडून असे होतांना दिसत नाही.

                भाजपाचे केंद्र सरकार जनविरोधी आहे म्हणूनच त्यांनी लोकसभेत व राज्यसभेत,१) शेतकरी विरोधी,”३ कृषी कायदे,२) जनविरोधी नवीन नागरिकत्व कायदा,३) बहुजन महीला विरोधी महीला आरक्षण कायदा,पारीत केलाय.

              तद्वतच केंद्र सरकारने,” कंत्राटी पध्दतीने सरकारी कार्यालयात कर्मचारी भरती प्रक्रिया शक्तीने राबविण्याचे आदेश,”देशातील,सर्व राज्य सरकारे यांना दिले नसते आणी कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया संबंधाने सर्वोच्च न्यायालयात तशा पध्दतीची माहिती सादर केली नसती.

           याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातंर्गत विद्यापीठाच्या कुलगुरु पदावर बहुजन समाजातील होतकरुंना डावलून ९५ टक्के उच्चवर्णीयांना नेऊन बसवले नसते आणि विद्यापीठातंर्गत प्राचार्य व इतर पद भरती प्रक्रिया अन्वये आर.एस.एस.वादी विचार सरणीच्या उचभ्रू लोकांना स्थान दिले नसते.

              भारत देशातंर्गत बहुजन समाजातील नागरिक हे शिकलेले आहेत पण अभ्यासू व जागरुक नाही हे भाजपा नेतृत्वाने व इतर मनुवादी विचारसरणीच्या उच्चभ्रूंनी चांगलेच ओळखले आहे‌.

             म्हणूनच बहुजन विरोधी सांस्कृतिक महोत्सवात व भावनात्मक विचारात त्यांना हरसंभव सातत्याने गुरफटून ठेवल्या जात आहे.बहुजन समाज विरोधी विचार त्यांच्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे माध्यमातून जाणिवपूर्वक लादली जात आहेत.

            याला कारण हे आहे की,शिक्षणाचे,राजकारणाचे,समाजकारणाचे,प्रशासकीय यंत्रणेचे,औधोगिक क्षेत्राचे व स्वसमाज संस्कृतीचे-स्वसमाज हिताचे महत्व त्यांना कदापी ओळखता येवू नये आणि बहुजन समाजाने आपल्या संस्कृतीचे जतन करु नये,आपल्या समाजात आपली संस्कृती रुजवू नये,आपल्या मुळ व उत्तम संस्कृती नुसार स्व समाजाची वैचारिक जडणघडण करु नये,याची बारीकपणे खबरदारी,”मनुवादी विचार सरणीच्या उच्चवर्णीय लोकांकडून व बहुजन समाजातील त्यांच्या वैचारिक-मानसिक गुलाम सहकाऱ्यांकडून आवर्जून घेतली जात आहे.

            तद्वतच महागाईवर नियंत्रण न आणणे,बेरोजगारांची समस्या दूर न करणे,शेतकऱ्यांना हमी भाव न देणे,सर्व शिक्षण मोफत व शक्तीचे न करणे,सरकारी व निमसरकारी कार्यालयात बहुजन समाजातील होतकरुंना समान संधी न देणे,देशातील सर्व उपेक्षित-वंचित-शोषित समाजाला आरक्षण देणारा कायदा न करणे,जातिनिहाय आधारित जनगणना न करणे,शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती न देणे,भांडवलदारांची खरबो रुपयांची कर्जे वारंवार माफ करणे व परत याच कर्ज बुडव्यांना वारंवार खरबो रुपयांची कर्जे देणे,शेतकऱ्यांची कर्जे माफ न करणे,जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न करणे,पळवाटा काढणारे मायाजाळ शब्द नागरिकांवर बिंबवण्यासाठी उपक्रम राबविणे हे भाजपचे मुख्य धोरण असल्याचे त्यांनीच स्पष्ट केले आहे.

            उच्चवर्णीयांना १० टक्के आर्थिक आरक्षण देणारा कायदा भाजपचे केंद्र सरकार तात्काळ करीत असेल व सर्वोच्च न्यायालय अशा आरक्षणाला मान्य करीत असेल तर बहुजन समाजातील नागरिकांना त्यांच्या मुलभूत व बाह्य मुलभूत अधिकाराचे रक्षण करणारा आणि हक्क बहाल करणारा आरक्षण कायदा का म्हणून भाजपाच्या केंद्र सरकारने केला नाही?हा प्रश्न उदभवतोच..

            एकाला मायेच व दुसऱ्यांना मावशीच समजून,देशातील नागरिकांत उभा भेद करणारी भाजपा देशातील नागरिकांना आता ठळकपणे दिसू लागली आहे.

              भाजपाच्या केंद्र सरकारकडे देशातंर्गत दळणवळण व जल मार्ग,मेट्रो मार्ग करण्यासाठी,अनेक प्रकारच्या मोठमोठाल्या बिल्डिंगा,सभागृहे बांधकामांसाठी आणि त्यांच्या जवळच्या भांडवलदारांचे खरबो रुपयांची कर्ज वारंवार माफ करण्यासाठी अमाफ रुपया आहे‌.मात्र बहुजन समाजातील नागरिकांची सर्वकश उन्नती करण्यासाठी रुपये नाहीत.हे या देशातील नागरिकांचे किती दुर्भाग्य समजाव?

               तद्वतच बहुजन समाजातील भाजपाचे खासदार व आमदार त्यांचे पक्ष नेतृत्व जसे सांगेल तसेच बोलतांना दिसतात.यापलीकडे जाऊन स्व समाजाच्या हितासाठी व उन्नतीसाठी ब्र शब्द सुध्दा लोकसभेत,राज्यसभेत,विधानसभेत,विधानपरिषदेत व बाहेर काढतांना दिसत नाहीत आणि बहुजन समाजातील महत्वपूर्ण मुद्यावर बोलतांना आढळून येत नाही.अशा त्यांच्या भुमिकांचे समर्थ देशातंर्गत बहुजन समाजातील नागरिकांनी करणे म्हणजे बहुजन समाजाचा पाण्यात डोंगा बुडविणेच होय.

           भाजपच्या सर्व धोरणांना देशातील सर्व भारतीयांनी लक्षात घेतले तर हा पक्ष,”बहुसंख्य किंवा बहुजन समाज विरोधी,पक्ष आहे हे स्पष्ट जाणवू लागेल!…

                बहुजन समाज वैचारिक क्षमतेला अनुसरून स्वतःला ओळखण्यात कमी पडत असल्यामुळे,बहुजन समाज वैचारिक क्षमता खोवून रसातळाला जात असल्याचे दिसू लागले आहे.”कुणी मानो या न मानो,परंतु देशातील बहुजन समाज हा वैचारिक पंगू होतांना जेव्हा लक्षात येते तेव्हा या समाजातील नेतृत्वाची किव येते. 

                मात्र,शिवसेना प्रमुख उध्दवराव ठाकरे,यांची रोखठोक भुमिका व स्पष्ट बोलण्याची कार्यपद्धत महाराष्ट्र राज्यासह देशातील राजकारणावर व समाजकारणावर प्रभाव पाडतोय हे निख्खळ सत्य आहे. 

             म्हणूनच मी शिवसेना प्रमुख उध्दवराव ठाकरे यांनाच मानतो‌‌‌‌…