महाराष्ट्रात प्रथमच लाखनी शहरात अभिनव व अनोख्या प्रकारे साजरा केला गेला इकोफ्रेंडली ‘ग्रीन गरबा- दांडिया व विजयादशमी महोत्सव’… — लाखनीत बिना फटाक्याच्या व पर्यावरण समस्या सांगणाऱ्या रावण प्रतिकृतीचे दहन… — नेचर पार्कमध्ये दररोज गरबा- दांडियाचे आयोजन…

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी:-

           ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे ‘लाखनी निसर्गमहोत्सव’ अंतर्गत पर्यावरणस्नेही नवरात्र व विजयादशमी निमित्ताने चार दिवसीय इकोफ्रेंडली “ग्रीन गरबा व दांडिया “चे आयोजन व पर्यावरणाच्या दहा अक्राळविक्राळ समस्या दर्शविणाऱ्या पर्यावरणनाशक तसेच फटाखे नसलेल्या रावण प्रतिकृतीचे प्रतिकात्मक दहन गुरूकुल आयटीआय परिसरात करून पर्यावरण संवर्धनाचा व इकोफ्रेंडली सणांचा संदेश देण्यात आला.तत्पूर्वी नेचर पार्क व गुरूकुल आयटीआय परिसरात स्वच्छता अभियान राबवून जमा केलेला कचरा पर्यावरणनाशक रावण प्रतिकृतीत भरण्यात आला. त्यामुळे फटाक्यांचा वापर करून आतषबाजी,ध्वनी व वायू प्रदूषण द्वारे चुकीचा संदेश देण्यापेक्षा परिसर स्वच्छता करून जमा केलेला केरकचरा पर्यावरणनाशक प्रतिकात्मक रावण प्रतिकृतीत भरण्यात आला.

              यावेळी शमी व आपट्याच्या झाडाचे तसेच ग्रीन गरबा व दांडिया वर्तुळातील ठेवण्यात आलेल्या वृक्षघटांचे पूजन प्रमुख अतिथी व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने, सेवानिवृत्त महसूल अधिकारी गोपाल बोरकर, ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, गुरुकुल आयटीआयचे प्राचार्य खुशालचंद्र मेशराम,टोलिराम सार्वे, मंगल खांडेकर, अशोक नंदेश्वर,दिलीप निर्वाण,माजी सभापती पुष्पा गिर्हेपुंजे,वर्षा वंजारी,जयश्री मेशराम,नगरसेविका विभा हजारे,सामाजिक कार्यकर्ता अशोक हजारे यांचे हस्ते करण्यात आले.यानंतर सर्वांना सोने म्हणून पाने न वाटता आपट्याच्या व शमीची झाडे सोने म्हणून वाटण्यात आले.

             मागील 18 वर्षांपासून अखंडपणे व सातत्याने लाखनी शहरात ‘श्रावण महिना ते दिवाळी सुट्टी’ पर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात येणारा ‘लाखनी निसर्गमहोत्सव’ अंतर्गत यावर्षी परिसरातील पर्यावरण संस्थांनी ‘गरबा व दांडिया तसेच विजयादशमी’चे आयोजन पर्यावरणस्नेही -इकोफ्रेंडली पद्धतीने कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण प्रस्तुतीकरिता ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे ‘तीन दिवसीय ग्रीन गरबा व दांडिया’चे आयोजन गुरुकुल आयटीआय परिसरात मानव सेवा मंडळ,नेफडो विभागीय वन्यजीव समिती,अभा अंनिस तालुका शाखा लाखनी यांचे सहकार्याने तर सकाळच्या वेळी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने तयार केलेल्या ‘नेचर पार्क’वर मानव सेवा मंडळ,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब, गुरुकुल आयटीआयतर्फे दहाही दिवस पर्यावरणस्नेही ग्रीन गरबा दांडिया आयोजित करण्यात आला.रात्रीच्या आयोजनाकरिता गुरुकुल आयटीआय परिसरात सर्वप्रथम हिरवेगार गोल रिंगण बनवून विविध प्रजातींचे झाडे, पक्षी, फुलपाखरे,प्राणी,साप यांचे छायाचित्रे प्रतिमा तसेच विविध पर्यावरण संवर्धन घोषवाक्ये फलक तिथे लावण्यात आले.विशेषतः फटाके न फोडता पर्यावरणस्नेही सणे साजरे करा हे सांगणारे भरपूर घोषवाक्ये फलक उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधत होते.

          तसेच विविध प्रजातींचे वृक्षांचे घट अर्थात वृक्षरोपे मांडण्यात आले.शिवशक्ती महिला गृप सावरी तसेच अशोकनगर,आदर्शनगर येथील महिला व पुरुषानी वृक्ष,पशु पाखरे,साप यांच्या प्रतिमेभोवती व वृक्षघटाभोवती अभिनव व आगळ्यावेगळ्या प्रकारे ‘ग्रीन गरबा व दांडिया’ तिन्ही दिवस सादर केले.शिवशक्ती महिला गृप सावरीने ‘ग्रीन वेशभूषा’ करून सादर केलेले विविध गरबा व दांडिया नृत्य सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

           तसेच विक्की मेश्राम व कलापथक संच यांनी पर्यावरण समस्यावर आधारित पथनाट्य सादर केले.आयोजकांतर्फे प्रथम दिवशी विषारी -बिनविषारी साप,दुसरे दिवशी पशु पाखरे तर तिसऱ्या दिवशी फुलपाखरे हे पर्यावरणाचे महत्वाचे घटक घेऊन त्यावर विस्तृत माहिती देण्यात आली. यावेळी ग्रीनफ्रेंड्सच्या सर्पमित्रांनी नुकतेच पकडलेले दोन अजगर व विषारी घोणस साप दाखवून त्यावरील अंधश्रद्धा दूर करण्यात आले.

          यावेळी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने यांनी माहीती देताना संगीतले की अशाप्रकारे अभिनव व अनोख्या पद्धतीने निसर्ग पर्यावरण संकल्पना धरून पर्यावरणस्नेही नवरात्री व विजयादशमीच्या निमित्ताने “ग्रीन गरबा व ग्रीन दांडिया”चे तसेच प्रतिकात्मक रावणदहनाचे आयोजन महाराष्ट्रात प्रथमच सादर केले गेले आहे.

          कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ मनोज आगलावे,अशोका बिल्डकाँन अभियंता नितेश नागरीकर,मुंबई ठाणे इन्स्पेक्टर नेताराम मस्के, वनौषधी शेती पुरस्कर्ते राजेश गायधनी,लाखनी नगरपंचायतचे नगरसेवक संदिप भांडारकर,ग्रीनफ्रेंड्सचे प्रा.अर्चना गायधने,ज्योती वैद्य, सुमित्रा गायधने,ओंकार आगलावे,आराध्या आगलावे,आशिष खेडकर, सामाजिक वनीकरण अधिकारी बेलखोडे ,मानव सेवा मंडळाचे, मारोतराव कावळे,विद्यमान जाधव, वसंत मेश्राम, दुलीचंद बोरकर,ताराचंद गिर्हेपुंजे , रामकृष्ण गिर्हेपुंजे,ऋषि वंजारी,माणिक निखाडे, शिवलाल निखाडे यांनी सहकार्य केले. गुरुकुल आयटीआय निदेशक- कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले.