चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
लाखनी:-
ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी द्वारा दिवाळीच्या काळात 27 वर्षानंतर आलेले व वर्षातील अखेरचे सूर्यग्रहणाच्या दर्शनाचा कार्यक्रम सोलर फिल्टर्स चष्म्याद्वारा,दुर्बिणीच्या व दूरदर्शीद्वारे ‘नेचर पार्क’ बसस्थानक लाखनी येथे लाखनी नगरपंचायतचे नगरसेवक संदीप भांडारकर,भंडारा येथून आलेले भंडारा नेचर क्लबचे संस्थापक राजकमल जोब यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.या कार्यक्रमास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा,गुरुकुल आय टी आय ,सिद्धिविनायक हॉस्पिटल , अशोका बिल्डकॉन,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास तसेच मानव सेवा मंडळ नेचर पार्क लाखनी यांचे सहकार्य लाभले.
ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह ,अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने यांनी ग्रहणाबद्दल इत्थंभूत शास्त्रीय माहिती देत चंद्रग्रहण सूर्यग्रहणाबद्दलच्या विविध अंधश्रद्धा गैरसमज दूर केले.
खगोलदर्शन कोजागिरीला सुद्धा त्यांनी आकाशातील विविध नक्षत्रे रास तसेच ग्रह, तारे, आकाशगंगा आणि चांद्रबिंबाची विस्तृत शास्त्रीय माहिती स्वतः तयार केलेल्या खगोलचार्टद्वारा चांद्रदर्शनाच्या निमित्ताने दिली होती. एकप्रकारे “तारे जमीन पर”
आणण्याचे कार्य केले गेले. यानंतर ‘माणुसकीच्या भिंती’ करिता राजकमल जोब भंडारा यांनी घरून आणलेले विविध प्रकारचे अनेक कपडे गरुजु लोकांकरिता बसस्टँडजवळ टांगण्यात आले.खैरी ब्राम्हणी येथे सुद्धा रिटायर्ड मेजर ऋषी वंजारी व वर्षा वंजारी यांचे हस्ते गरजूंना हेच कपडे व इतर साहित्य देण्यात आले.
सूर्यग्रहण कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, अशोक नंदेश्वर, लंडन येथे नोकरीनिमित्ताने स्थायिक असलेले परितोष जोब,शाल्मली जोब,तसेच बाल आकाशनिरीक्षक मेघिरा जोब,याईरा जोब,लाखनी नगरपंचायत कर्मचारी,अथर्व गायधने,प्रथमेश गायधने,ओंकार आगलावे,आराध्या आगलावे, अर्णव गायधने, मुन्ना बावनकुळे,अमित रामटेके, आयुष नंदेश्वर,मंगल खांडेकर,दिनकर कालेजवार,सामजिक कार्यकर्ता अशोक हजारे यांनी सहभाग नोंदवून अथक परिश्रम घेतले.