पारशिवनी : राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय ( क्षेत्र संचालन विभाग ) , नागपुर यांनी तालुका चे गावात स्वच्छता मोहीम आयोजित केली- यात सलाई आणि घोगरा महादेव (पारशिवनी) येथे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय ( क्षेत्र संचालन विभाग ) , सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय , भारत सरकार , नागपूर यांनी पारशिवनी तहसील अंतर्गत ग्राम सलाई आणि घोगरा महादेव नदीच्या काठावरील गावाच्या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.

       ही विशेष मोहीम 02 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे.या मोहिमेचा शुभारंभ विभागीय कार्यालय , नागपूरचे उपमहासंचालक श्री . राजेंद्र सी . गौतम आणि संचालक श्री श्रीनिवास उप्पाला यांच्या हस्ते करण्यात आले . 

     यावेळी गावातील सरपंच भुजंग ठाकरे , उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य , शाळेतील शिक्षक , प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व सलाई गावातील नागरिक मोठी संख्योत उपस्थित होते , त्यांना स्वच्छता कार्यक्रमाच्या उद्दिष्टांबाबत प्रबोधन करण्यात आले व गाव परिसर व नदी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

         यानंतर गावाच्या स्वच्छतेबरोबरच प्राथमिक शाळेतील मुलांसोबत प्रभातफेरीचेही आयोजन करण्यात आले . यावेळी या स्वच्छता मोहिमेत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून श्रमदान करण्यात आले . या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनीही उल्लेखनीय योगदान दिले . .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News