पारशिवनी :- तालुक्यातील आमडी गटग्रामपंचायत येथे महाराष्ट्र शासनाची महात्मा गांधी रोजगार हमी योजना,घरकुल योजना,घनकचरा वयस्थापन योजना, पाणी पुरवठा योजना, महीला बचत गट योजना व इतर योजनेचे रखडलेली विकास कामे पुर्ण करण्याकरीता आमडी गट ग्राम पंचायतच्या सरपंच्या शुभांगी भोस्कर यांनी आमदार जैस्वाल व पारशिवनी पचायत समितीचे गट विकास अधीकारी सुभाष जाधव यांना विभिन्न समस्या बाबत निवेदन दिले होते व नागरिकाना होणारा त्रास पाहुन समस्या दुर करण्या बाबत विनंती केली होती.
आमदार व अधिकारी याना दिलेले निवेदनावरून आमदार जैस्वाल व पंचायत समिती पारशिवनीचे गट विकास अधिकारी सुभाष जाधव यांनी दिलेले निवेदनाची दखल घेत आमडी गट ग्राम पंचायत कार्यलयातील सभागृहात सबंधीत पंचायत समिती अधीकारी व कर्मचारी यांना ग्रा.प.आमडी ला पाठऊन रखडलेल्या विकास कामांना गती देतांना ग्रामसेवक तायवाडे,घरकुल विभागाचे अभियंता मनोहर जाधव,मनरेगा अधिकारी ए.पी.ओ.देशमुख, कामडे,राऊत,तालुका संगनक अधीकारी सौरभ पवनीकर, बचत गट अधीकरी संदेश,स्वच्छता विभागाचे मुनेश दुपारे,देवा तुडलाम व संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन क्षेत्रातिल नागरिकाचे व शेतकर्याचे रखडलेली कामे पुर्ण करण्यात आले.
या प्रसंगी आमडी गट ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शुभांगी भोस्कर , उपसरपंच, ग्रा प सदस्य, शेतकरी व गावातील महीला पुरुष यानी उपस्थित राहुन संधी चा फायदा घेत संरपंच चे आभार व्यक्त केले.