प्रदीप रामटेके
संपादकीय
“काया,वाचा आणि मन,”या त्रि सुत्र शब्दांचा,महा अर्थ ज्यांना कधी कळलाच नाही,अशांच्या वाणीतून कधी घातक शब्द निघतील याचा नेम राहात नाही आणि त्यांच्या वाणीतून निघालेल्या घातक शब्दांमुळे कुणाचे केव्हा अतोनात नुकसान होईल हे सुद्धा सांगता येत नाही.
“शब्द हे शस्त्र असून तलवारी पेक्षा शेकडो पटीने ते धारधार असतात,याचे भान ज्यांना राहात नाही,असे लोक केव्हाही कुणाचे जिवन उध्वस्त करु शकतात किंवा केव्हाही कुणाच्या चारित्र्याचे हनन करु शकतात.याचा प्रत्यय आजपर्यंतच्या शाब्दिक प्रतिक्रिया,लिखित प्रतिक्रिया,आणि प्रतिक्रांतीतून स्पष्ट दिसून आलेला आहे..
“उचली जिभ लावली टाळ्याला,म्हणजेच अयोग्य कार्यपद्धती अंतर्गत प्रत्येक स्तरावरुन बोलले जाणारे शब्द हे विसंगत,धृणास्पद,द्वेषी,क्रोधिष्ट,रागिष्ट,आणि भ्रमिष्ट असतात,भांडखोर असतात,भांडण लावणारे असतात,मानसामानसात भेद निर्माण करणारे असतात,मानसाला तोडणारे असतात.तद्वतच संभ्रमावस्था निर्माण करणारे असतात,बदनाम करणारे असतात,जिवनातून उठवणारे असतात,हे उच्च शिकलेल्यांना सुध्दा कळत नाही तर कमी शिकलेल्यांना काय कळणार?हा गंभीर असा वैचारिक मुद्दा सामाजिक-राजकीय-धार्मीक-शैक्षणिक मंथनाच्या बाहेर फेकला गेला की काय?असेच कधी कधी वाटू लागते आहे.
“वाणी म्हणजे तोंडातून निघणारे शब्द,.. “काया म्हणजे कानाद्वारे ऐकलेले शब्द,..”मन म्हणजे मेंदू द्वारे क्रियाशील झालेले शब्द!
तोंडातून निघणारे शब्द कानावर पडतात तेव्हा मेंदू मनाला क्रियाशील करतो.मात्र तोंडातून निघणारे शब्द आणि कानावर पडलेले शब्द,”मन, जोपर्यंत शाहनिशा करीत नाही तोपर्यंत तोंडातून निघणारे शब्द व कानाद्वारे ऐकलेले शब्द हे सत्यावर आधारलेली असतात असे होत नाही.
काया-वाचा-मन म्हणजे नेमके काय?”तर,”स्वतःला तिन्ही प्रकारच्या शब्दांन्वये शब्दशुध्द करणे होय.
शब्दशुध्द करण्याची प्रक्रिया व क्रिया फक्त तथागत भगवान गौतम बुद्धांनी व त्यांच्या सुयोग्य भिख्खू संघानी आपल्या धम्म तत्वज्ञानाच्या देशणेतून प्रसारित केली आहे तथा विपश्यना अंतर्गत अनुभूती द्वारा संचालित केली गेली आहे.अर्थात आत्मज्ञान प्राप्त करणे व त्या ज्ञानातंर्गत प्रत्यक्ष अनुभूती मनुष्यमात्रास होणे आवश्यक आहे.किंवा धम्म देशनातंर्गत कमीतकमी शब्दान्वये अर्थ बोधाची जाणिव होणे गरजेचे आहे.
शब्द अर्थ बोधाची जाणिवच झाली नाही तर विनय कर्म भाव,चारित्र्य कर्म भाव,समानता कर्म भाव,
न्याय कर्म भाव,स्वातंत्र्य कर्म भाव,स्वतंत्र कर्म भाव,मनाचे कर्म भाव,भेद कर्म भाव,द्वेष कर्म भाव,राग व क्रोध कर्म भाव,अहंकार कर्म भाव,अकर्म भाव,भांडण व तंटे करणारा अकुशल कर्म भाव,एकमेकांना जोडणारा-तोडणारा-दुर सारणारा कर्म भाव,समजदार कर्म भाव,सदाचार कर्म भाव,आणि इतर प्रकारचे कर्म भाव हे मानसाला कदापि कळत नाही.
अर्थात ज्यांना शब्दाचा अर्थबोध कळत नाही ते लोक (मग तो कोणीही असो,किंवा कोणत्याही हुद्द्यावर असो..) जनकल्याणासाठी म्हणजेच लोकांच्या हितासाठी आणि उन्नती साठी कार्य करतात असे होत नाही…
भारत देशातील करोडो बहुसंख्य नागरिकांना शब्दाच्या अर्थाचा कर्म बोध कळत नसल्याने म्हणजेच अयोग्य व योग्य कर्म भाव (कार्य व कर्तव्य.) कळत नसल्याने भारत देशात मनुष्यमात्राच्या बाबतीत व मनुष्य मात्राद्वारे अनर्थच अनर्थ घडतो आहे हे विसरता कामा नये..