दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :- पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेने खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघाच्यावतीने आयोजित खेड केसरी कुस्ती स्पर्धा आळंदीतील फ्रुटवाले धर्मशाळेत रविवारी (ता. २९) होणार आहे. खेड केसरीचा किताब जिंकणाऱ्या पैलवानास चांदीची गदा आणि एकतीस हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. तसेच विविध प्रेक्षणीय कुस्त्या होणार आहे.
विविध वजन गटात स्पर्धा भरवली जात असून, बक्षिसांची खैरात केली जाणार आहे. याचबरोबर विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॅकसूटही दिले जाणार आहे. कुस्तीपटू मल्लांचे वजन रविवारी सकाळी नऊ ते अकरा वेळेत केले जाईल. तर, स्पर्धा दुपारी तीन वाजता खेळवली जाणार आहे. स्पर्धेसाठी मल्लांकडे स्वतःचे आधारकार्ड बंधनकारक असणार आहे.
यावेळी खेड तालुक्यातील ज्येष्ठ पैलवानांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती खेड तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी दिली.