ऋषी सहारे
संपादक
दखल न्युज भारत
आरमोरी – प्रधानमंत्री मातृ लाभ लाभार्थी महिलांना मिळावं याकरिता आझाद समाज पार्टीचे वतीने निवेदन देण्यात आले.
तालुका वैद्यकीय अधिकारी तालुका आरोग्य केंद्र,आरमोरी यांना निवेदन दिले असता त्यांनी पुढील कारवाईस पाठवू असे म्हटले. प्रधानमंत्री मातृ अनुदान निधी तालुक्यातील मातांना एक एक वर्ष होऊन ही मिळालेलं नाही.वास्तविकता अशी आहे की गरोधर असताना पहिला हप्ता आणि डिलिव्हरी नंतर दुसरा हप्ता मिळत असतो.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आरमोरी तालुक्यातील बऱ्याच मातेंना प्रधानमंत्री मातृ योजनेचा लाभ न मिळाल्याने सबंधित विभागाने याची संपूर्ण चौकशी करून मातांना मातृ योजनेचा लाभ तातडीने मिळवून घ्यावे या करिता निवेदन सादर करण्यात आले.
दहा दिवसात माहिती न मिळाल्यास आपल्या कार्यालयासमोर आझाद समाज पार्टी चे वतीने आंदोलन करण्यात येईल व यास आपण सर्वस्वी जबाबदार असाल.असा गर्भित इशारा ही देण्यात आला.
या संदर्भाने प्रतीलीपी –
१) जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली
२) सर्व वृत्तपत्र प्रतिनिधी
३) कृष्णा गजभे, आमदार आरमोरी विधानसभा सदस्य यांना देण्यात आल्या. निवेदन T.H.O. डॉ. वासनिक यांनी स्वीकारले.
ऋषीभाऊ सहारे ता.अ.पुरुषोत्तम मैंद तालुका कार्याध्यक्ष आ.स.पा., अँड. राज सुखदेव तालुका महासचिव आ.स.पा.,सुरेंद्र वासनिक तालुका सचिव आ.स.पा.,शुभम पाटील युवा आघाडी तालुका अध्यक्ष आ.स.पा.,नितीन भोवते शहर अध्यक्ष आरमोरी आ.स.पा. व आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.