उमेश कांबळे
तालुका प्रतिनिधी भद्रावती
वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ ७५ च्या शिवसेनेच्या उबाठा गटातर्फे उद्या दि.२७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता भद्रावती येथील मुर्लीधर पाटील गुंडावार मंगल कार्यालयात वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील विधानसभा सहकाऱ्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मेळाव्याला शिवसेना उबाठा गटाचे आमदार तथा पूर्व विदर्भ संपर्क नेते भास्कर जाधव मार्गदर्शन करणार आहेत.तसेच त्यांच्यासोबत विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, सुरेश साखरे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम, विधानसभा संपर्कप्रमुख रितेश रहाटे उपस्थित राहणार आहे.मेळाव्यापूर्वी त्यांच्या शुभ हस्ते येथील गांधी चौकातील शिवसेना (उबाठा) विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.
जाधव यांचे भद्रावतीत आगमन होण्यापूर्वी ते वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे सकाळी ११ वाजता उपस्थित राहुन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर टेमुर्डा, आनंदवन चौक, रत्नमाला चौक आणि नंदोरी येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना (उबाठा गट) जिल्हा प्रमुख तथा वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी केले आहे.