राजेंद्र रामटेके
ग्रामीण तालुका प्रतिनिधी कुरखेडा
गडचिरोली जिल्हातंर्गत असलेले मौजा कुरखेडा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने मौजा सोनसरी व मौजा चांदागड येथील (ग्रामीण भागातील) विद्यार्थी तिथे शिक्षण घेण्यासाठी दररोज आवागमन करतात.
मात्र,मौजा सोनसरी व मौजा चांदागड येथील विद्यार्थ्यांना बस फेरी अन्वये आवागमन करण्यासाठी कुरखेडा एसटी महामंडळाच्या आगार प्रमुखांचे योग्य सहकार्य लाभत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेला व काॅलेजला वेळेवर पोहचता येत नाही.
यामुळे विद्यार्थ्यांना काही पिरेडला दररोज मुकावे लागते आहे.याचबरोबर ५ वाजता नंतर मौजा सोनसरी व मौजा चांदागड येथे जाण्यासाठी बस फेरी वेळेनुसार नसल्याने कुरखेडा येथील बसस्थानकात दोन्ही गावच्या विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागते आहे.
सोनसरी व चांदागड येथील विद्यार्थ्यांनी एसटी आगार व्यवस्थापकांना वेळेवर बस फेरी सुरू करावी याबाबत विनंती केली.मात्र सदर दोन्ही गावच्या विद्यार्थ्यांना आगार प्रमुखांनी वारंवार उधट शब्दात बोलून त्यांची अनेकदा अवहेलना केली.
आगार व्यवस्थापकाच्या अवहेलना युक्त शब्दांनी दुःखी झालेल्या सोनसरी व चांदागड येथील विद्यार्थ्यांनी कुरखेडा तहसिलदार यांना निवेदन दिले व निवेदनाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली.
सोनसरी व चांदागड येथील विद्यार्थ्यांना सकाळी नऊ वाजता सोनसरी ते कुरखेडा व सायंकाळी पाच वाजता कुरखेडा ते सोनसरी,असी बसफेरी हवी आहे.