सोनसरी गावकऱ्यांनी नाकारले सेवावृत्त शिक्षिकेला… — शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या वयोवृद्ध शिक्षिका किंवा शिक्षकाला कंत्राटी शिक्षक म्हणून रुजू करून घेण्यास नकार..

          राजेंद्र रामटेके 

ग्रामीण तालुका प्रतिनिधी कुरखेडा…

      वयोवृद्ध व्यक्ती म्हणजे शरिराने कमकुवत असलेला आणि मनाने खचलेला असतो.अशा वयोवृद्ध व्यक्तींना कंत्राटी शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून नियुक्त करणे म्हणजे मुलांचे भविष्य उध्वस्त करणे होय,असा दुरदृष्टीकोण समोर ठेवीत वयोवृद्ध कंत्राटी शिक्षिकेला सोनसरी येथील ग्रामस्थांनी रुजू करून घेण्यास नकार दिला व तशा आशयाचे निवेदन कुरखेडा प.स.चे संवर्ग विकास अधिकारी यांना दिले.

            शारीरिक दृष्ट्या मजबूत असलेल्याच व्यक्तींना शासकीय नौकरीवर घेण्याचा शासनाचा नियम आहे.

      मग,”महाराष्ट्र शासन,रुपये वाचविण्याच्या नांदात कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया राबवितांना शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या वयोवृद्ध शिक्षिका किंवा शिक्षकाला कंत्राटी शिक्षक म्हणून रुजू करुन का म्हणून घेतोय? सोनसरी गावकऱ्यांचा हा प्रश्न न्यायसंगत आहे.

       गडचिरोली जिल्हातंर्गत कुरखेडा तालुक्यातील मौजा सोनसरी ग्रामपंचायतीच्या वतीने वयोवृद्ध शिक्षिकेला रुजू करुन न घेण्यासंबंधाने कुरखेडा प.स.चे संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

        वयोवृद्ध शिक्षिका नकोय या आशयाचे निवेदन देताना सरपंच सौ.मिनाक्षी वट्टी,उपसरपंच श्री.झुनुकलाल बी.चौधरी,व सदस्य जयंत प्रधान हे प्रामुख्याने उपस्थित होते.