आझाद समाज पार्टीचीं “माविम” कार्यालयावर धडक..!  — गणवेशाला विलंब का? – विनोद मडावी यांचा सवाल…

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली :- जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 3 महिने लोटून गणवेश न मिळाल्याने आझाद समाज पार्टी आक्रमक झाली असून शिक्षणाधिकारी यांना घेराव घातल्यानंतर माविम कडे टेंडर असल्याचे कळल्याने दि 25 सप्टेंबर रोजी “माविम” कार्यालयावर धडक दिली.

          माविम म्हणजेच महिला आर्थिक विकास महामंडळ यांना यावर्षी सरकारने गणवेश वाटपाचा टेंडर दिला. परंतु 3 महिने होऊन गणवेश शाळेत न पोहचल्याने आझाद समाज पार्टी ने माविम चे प्रमुख व्ही एम झाडें यांना भेटू देऊन विचारणा केली.

            प्राप्त माहितीनुसार एप्रिल महिन्यात जर सरकारने टेंडर दिला तर गणवेश जून पर्यंत ready असते. ते 26 जुलै दरम्यान शासनाने ड्रेस पाठविले. व पूर परिस्थिती मुळे अडचणी निर्माण झाल्या. दुसरं म्हणजे सरकारने आकडेवारी जुनी दिली त्यामुळे शाळेत गणवेश पुरवठा कमी जास्त झाला. अनेक शाळांनी गणवेश घेतलेच नाही कारण काही मुलांना बिना गणवेश घरी पाठविणे भेदभाव असता. वरून 2 गणवेश मिळतात तर एकच गणवेश वाटप चालू आहे.

           यासाठी सर्वस्वी सरकार जबाबदार आहे आणि गोर गरिबांच्या प्रश्नांवर एक शब्द न बोलणारी विरोधी पार्टी काँग्रेस सेना पण दोषी असून अशा दोन्ही पक्षांना गोर गरीब जनतेने त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन आझाद समाज पार्टी चे कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी केले आहे.

           माविम कार्यालयात भेटीदरम्यान जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, महासचिव पुरुषोत्तम रामटेके, जिल्हा संघटक हंसराज उराडे, विधानसभा उपाध्यक्ष जितेंद्र बांबोळे, मीडिया प्रमुख सतीश दुर्गमवार उपस्थित होते.