बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
लुमेवाडी (ता.इंदापूर) येथील प्रसिध्द हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबां( रहे.)च्या उरूसा निमित्ताने माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी दर्गाहला बुधवार (दि.25) संध्याकाळी भेट देऊन जोधपुरी बाबांच्या मजारवरती फुलांची चादर अर्पण केली व दर्शन घेतले.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी मुस्लिम बांधवांना व भाविकांना शुभेच्छा दिल्या.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुढे बोलत असताना म्हणाले की जोधपुरी बाबांचा दर्गाह महाराष्ट्रभर प्रसिद्धीस आहे.
या दर्गाहच्या विकासासाठी आपण आजपर्यंत सर्व प्रकारची मदत केलेली असून,जोधपुरी बाबांच्या भक्तनिवासाच्या विकासासाठी 50 लाख रुपये निधी आज मंजूर केले आहे.
आगामी काळातही आपले सहकार्य कायमच राहील.जोधपुरी बाबांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत,असे प्रतिपादन यावेळी दत्तात्रय भरणे यांनी केले.
याप्रसंगी दर्गाह ट्रस्टच्या वतीने दत्तात्रय भरणे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख उपस्थिती माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे,माजी सरपंच उस्मान शेख,लुमेवाडी गावचे विद्यमान सरपंच सुनील जगताप,शाबान सय्यद सर हुशालदिन शेख,सलीम शेख,जाकीर शेख, निजाम शेख,आफ्टर शेख,नजीर शेख फरीद जमादार,वाशिम शेख,टिपू शेख,फयाज शेख,टिप्पू खुशालदिन शेख,मामुद पठाण विशाल जगताप,अनिल जगताप,आकाश जगताप,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जोधपुरी बाबांच्या ऊरूसाचे हे 31 वे वर्ष आहे. दर्गाहला उरूसानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.लुमेवाडी येथे निरा नदीकाठी सर्वधर्मियांचे श्रध्दांस्थान असलेला सुफी संत फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा ( रहे.) यांचा दर्गाह आहे.
या उरूसास पुणे,सोलापूर,मुंबई,सांगली,सातारा,उस्मानाबाद,अहमदनगर,बीड आदी जिल्ह्यातील भक्तांबरोबर कर्नाटक,आंध्रप्रदेश या राज्यातूनही मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी उपस्थिती लावत आहेत.
यावेळी दत्तात्रय भरणे यांनी ग्रामस्थ व भाविकांशी संवाद साधला.यावेळी अनेक पदाधिकारी,ग्रामस्थ,युवक कार्यकर्ते,हितचिंतक उपस्थित होते.
दरम्यान,जोधपुरी बाबांच्या उरसानिमित्त मंगळवारी दि.24 संदल चा कार्यक्रम झाला. बुधवार दि. 25 हा उरुसाचा मुख्य दिवस होता.या दिवशी कव्वाली चा मुकाबला कार्यक्रम संपन्न झाला.
तर गुरुवार दि.26 रोजी जियारतने उरुसाची सांगता झाली.