कुकडहेटी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश… — विरोधी पक्षनेता विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश…

 

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधी

दखल न्यूज़ भारत

           सिंदेवाही तालुक्यातील कुकडहेटी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ४ सदस्य यांनी राज्याचे विरोधी पक्षनेता, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

             सिंदेवाही तालुक्यातील कुकडहेटी येथील ग्रामपंचायत ९ सदस्यीय असुन यामध्ये भाजप प्रणित पॅनेलची सत्ता होती. परंतु ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात राज्याचे विरोधी पक्षनेता, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने सुरू असलेल्या विकासकामांचा झंझावात वात बघता त्यांच्या कार्यप्रणाली व नेतृत्वावर विश्वास ठेवून कुकडहेटी येथील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम विरोधीपक्षनेता विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपूरी येथील निवासस्थानी पार पडला आहे.

           यावेळी पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये सरपंच रामचंद्र श्रीरामे, उपसरपंच उज्वला तोरणकर, सदस्य गुलाब मेश्राम, सदस्य सुभाष जांभूळे, सदस्य ललीता शेडमाके, सदस्या विजया दडमल यांचा समावेश आहे.

         यावेळी सिंदेवाही बाजार समितीचे संचालक जाणीक वाघमारे, ग्रा.पं.सदस्य पेटगाव सचिन दडमल, काॅंग्रेस कार्यकर्ते पंकज मुलकलवार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.