पारशिवनी 🙁 सं) साहोली रेतीघाटांवर बंदी असतानाही रेतीचा अवैध उपसा सुरूच आहे . महसूल विभागाच्या पथकाने रविवारी ( दि . २५ ) दुपारी कन्हान नदीवरील साहोली घाटात केलेल्या कारवाईमध्ये एक पोकलैंड मशीन जप्त केले . या मशीनचा वापर रेतीचा उपसा करण्यासाठी केला जायचा . साहोली घाट पारशिवनी पासुन दहा किलोमिटर अंतरावर आहे ( ता . पारशिवनी ) घाटातून रेतीचा उपसा केला जात असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाच्या पथकाने या घाटाची रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष पाहणी केली . त्यांना घाटात एक पोकलँड मशीन आढळून आले . पथकाला पाहताच मशीन चालक पळून गेल्याने या पथकाने ती मशीन ताब्यात घेतली . माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे स्टाफ सह यांनी घटनास्थळ गाठले दरम्यान तहसीलदार प्रशांत सांगडे व , पोलिस निरिक्षक पारशीवणी राहुल सोनवने स्टाफ सह पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवून मौजा साहोली शिवारात कन्हान नदीच्या पात्रातून पोकलेन चे साहाय्याने अवैध वाळू उत्तखनन करून 100 ब्रास कीं. 1.5 लाख रु. वाळू चोरी करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीत Tata Hitachi कं. चा पोकलेन कीं 50 लाख रु चा जप्त करून अज्ञात आरोपी विरुद्ध महसूल कायदा अन्वये तसेच भादवी कलम 379 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. ती मशीन जप्त महसूल विभागाच्या पथकाने साहोली घाटातून जप्त केलेली पोकलॅण्ड मशीन , केली . याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News