आळंदी : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या स्पार्क मिंडा फौंडेशन यांनी झुंज दिव्यांग संस्थेच्या सहकार्याने दोन दिव्यांग बांधवांचे स्वप्न पूर्ण करण्यात आले.झुंज दिव्यांग संस्थेला अनेक दिव्यांग बांधव भेट देत आहेत संस्था आपल्या परीने जेवढे शक्य होईल तेवढे दिव्यांग बांधवांना मदत करत आहे.असंच काही दिवसांपूर्वी दोन दिव्यांग व्यक्तींनी झुंज दिव्यांग संस्थेला भेट दिली होती आणि आपली समस्या मांडली होती की दैनंदिन जीवनामध्ये खुप अडचणी येत होत्या यावेळी त्यांनी व्हील चेयरची मागणी केली असता. संस्थेने लगेच स्पार्क मिंडा फाउंडेशनला ही अडचण बोलून दाखवली आणि स्पार्क मिंडा ग्रुपच्या वतीने दिव्यांग बांधवांना व्हील चेयर भेट देण्यात आली.

व्हील चेयर भेट दिल्यानंतर लाभार्थी दिव्यांगाच्या चेहऱ्यावर आनंद पाहून झुंज दिव्यांग संस्था आणि स्पार्क मिंडा फाउंडेशनने सायकल देता वेळी स्पार्क मिंडाचे पदाधिकारी समाधानी झाले.

यावेळी स्पार्क मिंडा फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी डॉ.सुमित सर,झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे,कार्याध्यक्ष राजेश दिवटे,खजिनदार दादासाहेब काशीद उपस्थित होते.

झुंज दिव्यांग संस्थेचे कार्याध्यक्ष राजेश दिवटे म्हणाले की या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो याच हेतूने आम्हाला जे काही शक्य आहे ते आम्ही सामाजिक बांधिलकीतुन करण्याचा आमचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न राहील.यावेळी व्हील चेयर भेट मिळाल्याबद्दल झुंज दिव्यांग संस्था आणि स्पार्क मिंडा फाउंडेशनचे लाभार्थी दिव्यांगानी आभार मानले

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News