चिखलदरा तालुका प्रतीनीधी :-अबोदनगो चव्हाण
चिखलदरा:-
प्रशिक्षणामध्ये वैयक्तिक आणी सार्वजनिक योजना समजून सांगण्यात आल्यात,जेन्हेकरून,”मी समृद्ध तर माझे गाव समृद्ध, — “माझे गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र,या युक्ती प्रमाणे सर्व कुटुंब लखपती करणे या संकल्पनेवर आधारित प्रशिक्षण नियोजन करण्यात आले.
अप्पर मुख्य सचिव नंदकुमार सर,श्री शांतनू गोयल सर आयुक्त मनरेगा यांच्या प्रेरणेतून तसेच जिल्हाधिकारी अमरावती व मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्यासाठी आणी गावाला समृद्ध करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणाची सर्व जबाबदारी तहसीलदार माया माने मॅडम व गटविकास अधिकारी जयंत बाबरे सर यांनी स्वतः लक्ष देत आपल्या अधिनस्त सर्व कर्मचारी ए.पी.ओ.आणी पि.टी. ओ.यांच्यावर सोपवून पार पाडली.
यामध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून नितीन शिरभाते आणी विलास कळमते यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिले आणी सर्व रोजगार सेवकांच्या मनात लखपती आणी समृद्ध गाव कसे करायचे या बाबीला प्रोत्साहीत केले. तसेच सर्व रोजगार सेवकाच्या प्रशिक्षणा बाबत प्रतिक्रिय अतिशय छान आल्या असून त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिये मध्ये गावाला समृद्ध करण्याची हमी दिली.
180 रोजगार सेवकाचे प्रशिक्षण एकत्र घेणे शक्य नसल्यामुळे तीन ठिकाणी तीन बॅच मध्ये विभाजीत केले असून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.ही पहिली बॅच चूर्णी येथील असून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे आणी दुसरी बॅच सेमाडोह आणी तिसरी बॅच टेम्बरूसोंडा या ठिकाणी होणार आहे.