प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

 

 

             चंद्रपूरच्या शक्तिरूप महाकाली मातेच्या शारदेह नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेने प्रारंभ झाला. महाकाली मंदिरात शारदेह नवरात्र मोठ्या भक्तिभावाणे आणि भंडारा उधळून साजरे होत आहे. चंद्रपूरकरांचे कोणतेही शुभ कार्य प्रारंभ होते ते देवी महाकालीच्या दर्शनाने. उग्र रूपे असलेली ही जगन्माता दुष्ट संहारक आहे. अश्विन व चैत्री नवरात्रासह दिवसातील अन्य दिवसही मातेच्या दर्शनासाठी दूरदुरून भाविक चंद्रपूरला येत असतात. प्रजाहित दक्ष गोंड राणी ‘हिराई’ ने बांधलेल्या या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश ,छत्तीसगड, आंध्रप्रदेश या चार राज्यातील भाविक गर्दी करतात. यंदा मात्र देवी महाकाली मंदिर मोठ्या संखेच्या उपस्थितीत नवरात्र पूजेसाठी उघडण्यात आले. विधिवत मंत्रोच्चारासह सकाळी घटस्थापना करण्यात आली. महाआरतीनंतर हे मंदिर सर्वांसाठी खुले झाले. चंद्रपूरकर नागरिकांनीही कोरोनाचा संसर्ग गेल्याने मंदिरात गर्दी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. एकदा नियमित उत्साही उत्सव बघायला मिळो, अशी भावना याप्रसंगी व्यक्त झाली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com