पारशिवनी:-दिं.२५ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी तारसा रोड कन्हान च्या भाजपा ओबीसी आघाडीच्या कार्यालयात मा. रामभाऊ दिवटे यांचे जिल्हा उपाध्यक्ष ओबिसी आघाडी च्या कार्यालयात रामभाऊ दिवटे यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती च्या निमित्ताने एकात्म मानववाद एवं अंतोदयेचे प्रणेते,श्रेष्ठ संघटनकर्ता, जनसेवा ची प्रतिमूर्ती, राष्ट्रवादी महान विचारक,पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी नमन करून कन्हान शहरात स्वच्छता करण्यात आली.
भारताचे पंतप्रधान, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते, मान.नरेंद्र मोदी जी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर हया पंधरवडा कार्यक्रम निमित्ताने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती तारसा रोड येथे ओबिसी आघाडी चे कार्याल् यात साजरी करण्यात आली. नंतर स्वच्छता अभियान कार्यक्रम करून स्वच्छता करण्यात आली
या कार्यक्रमा प्रसंगी , नागपुर जिला ओबिसी आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ दिवटे, तालुका भाजपा अध्यक्ष अतुल हजारे कन्हान भाजपा अध्यक्ष डॉ. मनोहर पाठक, कन्हान भाजपा महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती तुलेशा नानवटकर यांचे संयुक्त तत्वधानात आयोजीत कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे महामंत्री सुनिल लाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष शंकर चाहांदे, उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, अमिश रुदे मयुर माटे ,शैलेश शेळकी ,दीपचंद शेडे महीला आघाडी ची सुनंदा ताई दिवटे, नगरसेविका सुषमा चोपकर , सेविक | संगिता खोब्रागडे, सुषमा मस्के,सह विविध आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते वअनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.