रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर :- समाजवादी गणराज्य पार्टी अध्यक्ष कपिल पाटील यांचे आदेशान्वये महासचिव अतुल देशमुख,प्रदेशाध्यक्ष अजित शिंदे यांनी समाजवादी गणराज्य पार्टीच्या चिमूर तालुका महिला अध्यक्षपदी रिना नितीन पाटील यांची नियुक्ती केली आहे.रिना पाटील यांना नियुक्तीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
शिक्षण,समता, प्रतिष्ठा,संधी आणि सत्ता प्रत्येकाच्या वाट्याला यावी यासाठी लोकशाही, धर्मनिरपेक्ष,समाजवादी आणि विज्ञानाभिमुख समाजरचनेसाठी समाजवादी गणराज्य पार्टी कार्यरत आहे.शिक्षक आमदार म्हणून १८ वर्षे विधानपरिषदेत शिक्षक, विद्यार्थी,शेतकरी,मजूर,शोषित वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडली.कपिल पाटील हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत.
रिना पाटील यांची समाजवादी गणराज्य पार्टीच्या तालुका महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.