उपोषण सुटले पण समस्या कायमच,डॉक्टर कॉलनी कडे नगर परिषदेचे दुर्लक्ष…

युवराज डोंगरे/खल्लार 

            उपसंपादक 

         दर्यापूर येथील प्रतिष्ठित डॉक्टर कॉलनी परिसरामध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने रोगराई तसेच परिसरातील इमारतींना धोका निर्माण झाला आहे. या मागणीसाठी काही दिवसापूर्वी डॉक्टर कॉलनी मधील सर्व डॉक्टर म़ंडळी नगरपरिषदेच्या समोर प्राणांतिक उपोषणास बसले होते. त्यानंतर नगर परिषदेच्या प्रशासन विभागाने या उपोषणाची नोंद घेऊन तातडीने परिसरातील घाण पाणी काढून टाकण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते डॉक्टरांना दिले होते.

  डॉक्टरांनी नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले होते. मात्र दोन दिवस उलटले तरी अजून डॉक्टर्स कॉलनीमध्ये साठलेल्या पावसाच्या पाण्याची कायम परिस्थिती असून सर्वत्र मोठा तलाव निर्माण झाला आहे.

            करिता डॉक्टर्स कॉलनी मधील डॉक्टरांनी याबाबत प्रशासनास स्मरण करून देऊन तातडीने साठलेल्या पाण्याची व्यवस्था लावावी व डबक्या मध्ये मुरूम टाकावे व ज्या खाजगी मालकाची सदर जागा आहे त्याच्याकडून नुकसान भरपाई भरुन घ्यावी अशी मागणी ही डॉक्टर कॉलनीमधील डॉक्टरांनी नगरपालिका प्रशासनाकडे पुनश्च केली आहे. अन्यथा सदर डॉक्टर मंडळी जिल्हा धिकारी अमरावती यांची भेट घेणार आहेत.