पंकज चहांदे
देसाईगंज/वडसा तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्रात एस सी एस टी ओबिसींच्या संवैधानिक अधिकार प्राप्त करुन देण्यासाठी सातत्याने लढा उभारणाऱ्या प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना बळ देण्यासाठी सर्व समाज घटकांनी सहकार्य करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी चे राज्य उपाध्यक्ष कुशल मेश्राम यांनी केले.
देसाईगंज येथिल सिंधु भवन येथे आरमोरी विधानसभा क्षेञातिल वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला राज्य उपाध्यक्ष कुशल मेश्राम, जिल्हाध्यक्ष बाळु टेंभुर्णे, विधानसभा प्रभारी तथा जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, जिल्हा संघटक भिमराव शेन्डे, जि. के. बारसिंगे, योगेन्द्र बांगरे, विलास केळझरकर, कवडु दुधे, नर्मदा मेश्राम, कोरची तालुका अध्यक्ष सुदाराम सहारे, अशोक कऱ्हाडे, कुरखेडा तालुका अध्यक्ष तुळशिराम नंदेश्वर, आरमोरी तालुका अध्यक्ष जगदिश दामले, देसाईगंज तालुका अध्यक्ष विनोद मेश्राम, आशिष घुटके, एन. आर. रामटेके, उद्धवराव खोब्रागडे, नानाजी कऱ्हाडे, लक्ष्मण नागदेवते, प्रविन रामटेके, उमाकांत बन्सोड, जगन बन्सोड, अभिमन्यु बन्सोड, शिवाजी मेश्राम, विनोद लांजिकर, ज्योती दहिकर यांचेसह वंचित बहुजन आघाडिचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्याला संबोधित करतांना कुशलभाऊ मेश्राम म्हणाले की, कॉंग्रेस व भाजप सातत्याने एससी एसटी ओबिसींची दिशाभुल करुन आरक्षण संपविण्याचे काम करित आहे. लोकसभा निवडनुकित भाजप ने संविधाम बदलायचे आहे, असे वातावरण निर्माण केले तर कॉंग्रेस ने या देशाचे संविधान वाचवायची ही शेवटची संधी असल्याचा भ्रम निर्माण केला. आंबेडकरी समाजाने या देशाचे संविधान वाचवायचे आहे म्हनुण न मागता कॉंग्रेस ला मतदान केले, जेव्हा सर्वोच्छ न्यायालयाने एससी एसटी आरक्षणाचे वर्गिकरण करण्याचा व क्रिमिलेयर लावण्याचा निर्णय जाहिर केला त्याची अमलबजावणी कॉंग्रेस ची सत्ता असलेल्या कर्णाटक व तेलंगाना राज्य सरकारने केली मग कॉंग्रेस पक्ष एससी एसटीं चा हितचिंतक कसा असु शकतो असा सवालही या प्रसंगी उपस्थित केला.
वंचित बहुजनांना न्याय मिळवुन देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर सातत्याने लढा उभारत असुन ओबिसींच्या आरक्षणात मराठ्यांनी ढवळाढवळ करु नये यासाठी ही लढा उभारत आहेत आरमोरी विधानसभा क्षेञात वंचित बहुन आघाडी चा आमदार निवडुन देऊन बाळासाहेब आंबेडकरांना बळ द्यावे असे आवाहन ही या प्रसंगी केले.
या कार्यक्रमात अनिल दहलानी सरिता भैसारे यांचेसह ३० कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. सोबतच आंबेडकरी चळवळित सतत कार्य करणाऱ्या ४० वयोव्रूद्ध कार्यकर्त्यांचा शाल श्रिफळ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक मेश्राम व आभार प्रदर्शन शिवदास बन्सोड यांनी केले.