शिवसेना (उबाठा) तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहांडी महोत्सवाचे आयोजन…

      उमेश कांबळे

भद्रावती तालुका प्रतिनिधी 

            भद्रावती येथील पोलिस ठाण्या जवळील तालुका क्रिडा संकुल येथे शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दि.२७ ऑगस्ट मंगळवारला भव्य दहीहांडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

      या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे आहेत.

        हा महोत्सव मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ व सायं.६ ते १० वाजेपर्यंत पार पडणार आहे.

         या महोत्सवात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते भारत गणेशपुरे हजेरी लावणार आहे. कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी श्रीकृष्ण ,मुलींसाठी राधा तर विवाहित महिलांसाठी माँ यशोदा वेशभुषा स्पर्धा तसेच रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. या विविध स्पर्धामध्ये भाग घेणा-यासाठी लाखो रूपयांची बक्षिसे ठेवण्यांत आली आहेत.यशस्वी स्पर्धकांसह स्पर्धेत सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

          कार्यक्रमात प्रसिद्ध लावणी कलाकार सोनाली पाटील व त्यांच्या संचाचा समावेश आहे. कार्यक्रमाचे अँकरिंग प्रसिध्द अँकर परेश हे त्यांच्या खास डॉक्टर गुलाटीच्या वेशभुषेत करणार आहे. जे विदर्भरत्न पुरस्काराने सन्मानित झाले आहे.

          या महोत्सवात भद्रावतीतील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांचा सन्मान करण्यांत येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक जिल्हाप्रमुख तथा वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे व समस्त शिवसेना (उबाठा) पदाधिका-यांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रपरिषदेत केले. याप्रसंगी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी, महेश जीवतोडे आदी उपस्थित होते.