डॉ.सोमदत्त करंजेकर यांचा बनावट व्हाट्सअप अकाउंट बनवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न.‌

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली – डॉ. सोमदत्त ब्रह्मानंदजी करंजेकर यांचा बनावट व्हाट्सअप अकाउंट ९०२xxxx०३२ या फोन नंबर वरून बनवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. 

      या बनावट व्हॉट्सऍप अकाउंट बनवलेल्या व्यक्तीने डॉ.सोमदत्त करंजेकर यांच्या फोटोही डीपी प्रोफाइल म्हणून वापरला आहे आणि ‘डॉ. सोमदत्त करंजेकर फॅन क्लब.apk’ नावाची एक फाईल देखील या नंबर वरून साकोली,लाखनी,लाखांदूर तालुक्यातील लोकांच्या फोनवर पाठविण्यात येत आहे.

         या नंबर चे ट्रूकॉलर वर निळकंठ पाटील असे नाव दिसत आहे.सदर नंबर वर फ़ोन केला असता ही व्यक्ती खामगाव तालुक्यातील असल्याचे कळाले.

       डॉ.सोमदत्त करंजेकर यांनी याबाबतची तक्रार साकोली पोलिस ठाण्यात व साइबरक्राईम ला केली आहे. 

     आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी डॉ. सोमदत्त करंजेकर हे साकोली मतदारसंघातील जनतेच्या मनातील प्रबळ दावेदार आहेत,त्यामुळे असे काही खोटे कृत्य करून कुठेतरी जनतेत संभ्रम तयार करण्याचे कारस्थान असल्याची दाट शक्यता आहे.

       जनतेची कोणत्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये याकरिता पोलीस स्टेशन साकोली व सायबर क्राईम भंडारा येथे डॉ‌.करंजेकर यांनी तक्रार दाखल केली आहे.