आवळेघाट येथे शिवस्वराज्य दूध संकलन केंद्राचे उद्घाटन.. — प्रधान मुख्यसंरक्षक श्री.माहीप गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन.

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

          पारशिवनी तालुक्यातील मौजा आवळेघाट या गावात शिवस्वराज्य बहुउद्देशीय विकास बांधकाम संस्थाचे डॉ.श्याम प्रसाद मुखर्जी,जनवन समिती संस्थेच्या नवीन उपक्रमांतर्गत शिवस्वराज्य दूध संकलन केंद्राचे उद्घाटन प्रधान मुख्यसंरक्षक वन्यजीव महाराष्ट् शासनचे श्री.माहीप गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

           श्री.प्रभुनाथ शुक्ला उपसंचालक,पेच वाघ्र प्रकल्प, नागपूर,प्रमुख पाहुणे श्री.संदीप भारती (एसीएफ, पेच वा घ्र प्रकल्प), श्री.प्रवीण लेले (वन परिक्षेत्र अधिकारी,पेच वाघ्र प्रकल्प), ICICI फाउंडेशनचे अधिकारी श्री.राजू पवार आणि मनीष खेडकर या उद्घाटन समारंभास प्रामुख्याने उपस्थित होते. 

          या व्यतिरिक्त श्री.राजेश जी देशमुख,मदर डेअरी प्रमुख,श्यामा प्रसाद मुखर्जी, जनवन समितीचे श्री.शिशुपाल बेद्रे जनवन विकास समिती आवाडेघाट,महादेवजी भारसागडे वनसमिती सचिव चारगाव,सरपंच श्री.विष्णूजी सहारे,गट ग्रामपंचायत चारगाव,रोशन मुन,ग्रामपंचायत सचिव , रोहिदास चव्हाण,बीट गार्ड प्रचार प्रकल्प,चंद्रशेखर राऊत,अरुण ढोरे,मुरलीधर मैड,अभिजित मैड,आ.सुभाषजी दुपारे,वंदनाताई भुरे,आवाडेघाट (पोलीस पाटील), रुपाली बेंद्रे,भाग्यश्री राऊत,रेखा बेद्रे,चंदा राऊत,वैशाली बेंद्रे,प्रियांका दुपारे,राजू राऊत,वामन बेद्रे,अनिल ढोंगे,पृथ्वीराज चव्हाण,रमेश बागडे,इतर गावकरी उपस्थित होते.