प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव साईश सतिश वारजूकर यांच्याकडून आर्थिक मदत…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर:- 

           नगर परिषद चिमूर क्षेत्रातंर्गत वाल्मिक चौक गुरुदेव वॉर्ड येथील शशिकला मोहिनणकर यांचे अतीवृष्टीमुळे घर पडले होते.यामुळे त्यांनी युवक काँग्रेस कमिटी चिमूर येथे आर्थिक मदत मिळण्याकरीता महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश महासचिव साईश सतिश वारजुकर यांना अर्ज केले होते.

          त्या अर्जाची दखल घेत आज दि.२५ जुलै २०२४ रोजी युवक काँग्रेस प्रदेश महासचिव साईश सतिश वारजुकर यांनी घरी जाऊन तात्काळ आर्थिक मदत केली.

           यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव पाटील नागेंद्र चट्टे,माजी विधानसभा अध्यक्ष संदीप कावरे,युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष ईशांत मामीडवार,सारंग मामींडवार,अमित सातपुते,अमित मोदी,अक्षय नागरीकर व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.