पूरग्रस्त भागाची पाहणी करत खा. नामदेव किरसान यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या….

प्रितम जनबंधु

    संपादक 

 आरमोरी:- गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खा. नामदेव किरसान यांनी आरमोरी येथील स्थानिक विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली.  कार्यकर्त्यांच्या तसेच नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

       शेतकरी, व्यावसायिक, व्यक्तिगत प्रश्न असणाऱ्या जनतेची गा-हाणी ऐकून घेतली. काही प्रश्नांबाबत प्रशासकीय स्तरावर पत्रव्यवहार करण्याचे तर प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी या भेटी दरम्यान उपस्थितांना दिले.

              खा. किरसान यांनी अनेक विषयासंदर्भात थेट आश्वासने नागरिकांना यावेळी दिली. त्याच बरोबर विकास कामांचा पाठपुरावाही करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले. समस्यांबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधून त्यांना न्याय देणार असल्याचे कार्यक्रमाच्या शेवटी खा. नामदेव किरसान यांनी सांगितले.

       या आढावा बैठकीला माजी आ. आनंदराव गेडाम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामन सावसागडे, काँग्रेस नेते रामदास मसराम, डाँ.शिलू चिमुरकर, काँग्रेसच्या जिल्हा महासचिव रोशनी बैस, नदीम नाथानी, रजनीकांत मोटघरे, काँग्रेस चे कोषाध्यक्ष विजय सुपारे, माजी उपसभापती नितीन राऊत, न.प.चे माजी बांधकाम सभापती सागर मने, जि. प. च्या माजी सभापती वेणूताई ढवगाये, माजी सदस्य अमोल मारकवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भूषण सातव, आपचे कोपुलवार, मुकेश वाघाडे, सत्यवान वाघाडे, रघुनाथ मोंगरकर, संजय वाकडे, चंदू टेंभुरने, अनिल किरमे, दिवाकर पोटफोडे, विद्या सपाटे, विनोद कुंभारे, प्रल्हाद राऊत, पुरुषोत्तम वैद्य, चरण डोनाडकर, साबीर शेख, हिवराज बोरकर, जावेद शेख, सारंग जाम्भूळे, पराग वाघाडे, यशवंत लोणारे, नितीन खोब्रागडे, गोन्नाडे, मनोज बोरकर, यासहित महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

  खा.किरसान यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी….

          आढावा बैठकीनंतर खा.किरसान यांनी आरमोरी येथील गाढवी नदीला पूर आल्याने पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणीदरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली आल्याने शेकडो शेतकऱ्यांचे लागवड केलेले पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांचे निदर्शनास आले. यावेळी किरसान यांनी तहसीलदार यांना फोन करून शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे असे आदेश दिले.

          मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. गोसेखुर्द व इतर धरणांचे संपूर्ण दरवाजे उघडल्याने नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता आपत्ती व्यवस्थापन व विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, असे निर्देश चिमूर-गडचिरोली निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी दिले. तद्वतच आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क राहून पुलावरून पाणी वाहत असलेल्या पुलावर अनुचित घटना घडू नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देश खासदार किरसान यांनी तहसीलदार यांना दिले.