वारकऱ्यांचा संताप,माउलींच्या पालखी सोहळ्यासमोर वारकऱ्यांचा ठिय्या…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : आषाढी एकादशी संपवून परतीच्या वाटेवर असलेल्या संतड ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत मोठा गोंधळ झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे निरास्नान झाल्यानंतर रथाच्या पाठीमागे असलेल्या वारकऱ्यांना पादुकांचे दर्शन देण्यात आले नाही. यामुळे त्या वारकर्‍यांनी दर्शन न दिल्यानेढ वारकरी चांगलेच आक्रमक झाले. यावेळी वारकऱ्यांनी संताप व्यक्त करत पालखीसमोर ठिय्या मांडला होता. या घटनेमुळे गोंधळ उडाला.

            संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी (ता. 26 जुलै) सातारा जिल्ह्यामधून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. याचवेळी निरा नदीमधील दत्त घाटावर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रथेप्रमाणे त्यानंतर माऊलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या जातात. पादुकांचे निरा नदीच्या पाण्यात स्नान घातले जाते.

            गेले अनेकवर्ष या स्नानाची परंपरा सुरु आहे. पण नीरा स्नान झाल्यानंतर पुढच्या विणेकरांना फक्त पादुकांचे दर्शन दिले गेले. पण रथा मागे चालणाऱ्या मागच्या वारकऱ्यांना पादुकांचे दर्शन न दिल्यामुळे वारकरी आक्रमक झाले आहेत. रथामागे चालणाऱ्या दिंडीच्या विणेकरांना दर्शन देत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी वारकऱ्यांची भूमिका घेतली.

          नीरा नदी परिसरात विणेकरांनी संताप व्यक्त करत परंपरा मोडीत काढू नका, अशी मागणी केली. तसेच रथामागे चालणाऱ्यांना दर्शन देत नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका यावेळी वारकऱ्यांनी घेतली. संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथ पुढे गेला पण मागच्या दिंड्या थांबून होत्या. त्यानंतर काही वेळाने या रथाच्या मागे असणाऱ्या दिंड्या मार्गस्थ झाल्या. पण यावेळी विश्वस्त आणि वारकरी यांच्यामध्ये झालेल्या या वादाची चांगलीच चर्चा झाली.