कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:- काल सकाळी १० वाजताच्या दरम्यान पारशिवनी पोलिस स्टेशन हद्दीतील पश्चिमेस १७ कि.मी.अंतरावर मौजा सालई ( मोकासा) येथील राहीवासी युवक विशाल वसंता घोडेस्वार वय २५ वर्ष हा गावातील हनुमान मंदिरा जवळील तलावाच्या काठावर फिरत असताना पाय घसरून पाण्यात पडला व पाण्यात बुडुन मरण पावला.
विशाल तळ्यात बुडाल्याची माहिती मिळताच गावातील लोक तलावावर पोहचले.मृतकचे मोठे भाऊ हर्षल वसंता घोडेस्वार वय २७ वर्ष यांनी पारशिवनी पोलीसाना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पारशिवनी पोलीस घटना स्थाळी मौजा सालाई ( मोकासा) पारशिवनी येथे तळ्यावर पोहचली व मृतक विशाल घोडेस्वार यांचा मृतदेह बाहेर काढले.घटना स्थळचा पंचनामा करून शव विच्छेदाना करिता पारशिवनी ग्रामिण रुग्णालय येथे पाठवले.
नंतर मृतकचे मोठे भाऊ हर्षल वसंता घोडेस्वार यांनी पोलिसात तक्रार नोदवली.पारशिवनी पोलीसानी गुरुवार दिनांक २५ जुलाईला दुपारी ४.०० वाजलच्या दरम्यान तक्रार नोद करून मर्ग क्र ३७/२४ अन्वये कलम१९४ भा.ना. सु. स. अन्वये गुन्हा नोंद केला.
पुढील तपास पो.नि. रविकुमार थोरात यांचे मार्गदर्शनात पोलिस मंगेश ढबाले हे करित आहे.