नवजीवन कॉन्व्हेंट मध्ये शालेय प्रतिनिधीसाठी निवडणूक…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) साकोली येथे विद्यार्थी व विद्यार्थीनी प्रतिनिधी निवडीसाठी निवडणुक पार पडली. लोकशाहीची मुल्ये विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांच्या अंगी यावीत म्हणुन प्राचार्य मुजम्मील सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नवजीवन कॉन्व्हेंट मध्ये वोटिंग मशिन ॲपच्या साह्याने मतदान घेण्यात आले.

            मतदानासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस व उत्साह सिगेस पोहचला होता. उमेदवारांनी प्रत्यक्ष प्रचार सभा घेतल्या, विध्यार्थ्यांसाठी हक्कांच्या भूमिका निर्देशीत केल्या यामुळे जनू विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका होत आहेत की काय? असा भास होत होता. ही सर्व निवडणूक प्रक्रीया निवडणूक अधिकारी सतिश गोटेफोडे, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर व वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास यांच्या निर्दर्शनाखाली घेण्यात आली.

         निवडणुकीसाठी योग्य प्रशिक्षण देऊन मतदान प्रिसायडिंग अधिकारी सरताज साखरे, रोझी पठाण, दीपा रीनाईत, वैशाली राऊत व मतदान अधिकारी वंशिका मेश्राम, पार्थ कापगते, सायना बारसागडे, भावार्थी नवखरे, आदित्य कापगते, जिया लाडे, हर्ष कापगते, रिद्धेश हटवार, दिशा ईटणकर, आदित्य चौधरी, हेमंत डोंगरवार, पियुषी ताराम, मृणाली कुंबरे, परिणीता पशिने, वेदांत हुमने, कुणाल कापगते, तूपेश बिसेन, अक्षरा लांबकाने तसेच तंत्रज्ञ अधिकारी लाछी किरपान, जया बडवाईक, मेघा संग्रामे यांना कारभार सोपविण्यात आले होते.

           यावेळी इयत्ता १ ते १० वीच्या विद्यार्थ्यानी मतदान केले. मतमोजणी नंतर कु. निधी ईश्वरलाल ब्राह्मणकर विद्यार्थीनी प्रतिनिधी तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन विक्रम राजकुमार चौधरी यांना विजयी घोषीत करण्यात आले. तसेच इतर उमेदवार कर्तव्य गुप्ता, आयुष राऊत, कु. आरोही राऊत, कु. अनवी अग्रवाल, कु. प्रथा तनवानी व कु. रुचिका पालीवाल यांना विविध शालेय खाते वाटप करून दिले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय नियमावलीनुसार शपथ देण्यात आली.

            निधी ईश्वरलाल ब्राह्मणकर विद्यार्थीनी प्रतिनिधी व विद्यार्थी प्रतिनिधी विक्रम राजकुमार चौधरी यांना पुष्गुच्छ व विजयी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधींचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री ब्रह्मानंद करंजेकर, संस्था सचिव सौ. वृंदाताई करंजेकर व संस्था अध्यक्ष डॉ सोमदत्त करंजेकर यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा देऊन त्यांची प्रशंशा केली. 

           निवडणुकीचा कार्यक्रम यशस्वी घेण्यासाठी जयंत खोब्रागडे, अजय बाळबुद्धे, किशोर बावनकुळे, विन्नुष नेवारे, श्रीधर खराबे, अशोक मीना, विजय परशुरामकर, जोशिराम बिसेन, प्रशांत वालदे, सुनिता बडोले, वैशाली भगतकर, पुण्यप्रभा उपासे, प्रतिमा डोंगरे, स्वेजल टेंभुर्णे, माधुरी हलमारे, ज्योती डोंगरवार, लिलेश्वरी पारधी, वैशाली राउत, रेखा हातझाडे, अस्मिता मस्के, माधवी बन्सोड, अनिता धुर्वे, मेघा संग्रामे, विशाखा पाशिने, इतर शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.