चोरी करणाऱ्या दोन युवकांना अटक.. — कन्हान पोलीसांची कारवाई,सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी: – येथील नाका नं. ७ अंतर्गत मनोहर खेडकर यांचे घराचे मागचे दाराची आतील कडी तोडुन आत प्रवेश करून घरातील कपडे प्रेस कराची प्रेस व नगदी पाच हजार असे सात हजार रूपयाची चोरी करून पसार झालेल्या आरोपीना कन्हान पोलीसानी अटक केली आहे. 

           मनोहर मारोतराव खेडकर,वय ४६ वर्ष,हे रा.मनसर (कांद्री माईन्स) ता.रामटेक येथील मुळचे रहिवासी आहेत.

        ते ह.मु. बाळकृष्ण वाडीभस्मे यांचा घरी एक वर्षा पासुन किरायाने राहात आहेत.त्यांचा सध्याचा पत्ता,नाका नं.७ कन्हान ता.पारशिवनी,जि. नागपुर येथे राहत असुन बुधवार (दि.२४) च्या मध्यरात्री १ वाजताच्या दरम्यान म्हणजे गुरूवार (दि.२५) जुलै ला मनोहर खेडकर घरी झोपले असता घरा शेजारी राहणारे पवन सोनवाने यांची पत्नी अलीशा सोनवाने यांनी आम्हला झोपेतुन उठवून सांगितले की,तुमच्या घरुन कोणीतरी एक पांढरा शर्ट व पांढरा पॅन्ट घालुन अनोळखी इसम घरून पळतांनी दिसला आहे. 

      त्यावरुन शेजारी राहणारे पवन सोनवाने व त्याची पत्नी अलीशा सोनवने व घरच्या लोकांसह झोपेतुन उठुन बघितले तर घराचे मागच्या रुमचा दरवाजा उघडा होता व पत्नीची बॅग खाली पडली असुन बॅगेत ठेवलेले नगदी ५ हजार रुपये त्यात नव्हते. 

         त्या नंतर समोरच्या रूम मध्ये बधितले.तेथील कपडे प्रेस करणारी प्रेसचा प्लग काढुन प्रेस किमत २ हजार रूपये ही रूम मध्ये नव्हती.म्हणुन मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरातील मागच्या दरवा ज्याची कड़ी तोडुन आत प्रवेश करून घरातील एकुण ७ हजार रुपयाचा माल चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला फिर्यादी मनोहर खेडकर यानी अज्ञात चोरा विरुध्द तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी अप क्र. ४७४/ २०२४ कलम ३३१ (४), ३०५ बीएनसी अन्वये गुन्हा दाखल केला.

         पोलीसानी तपास करित आरोपी १) आशिष विजयसिंग ठाकुर वय २७ वर्ष, २) मयुर सुनिल पुरे वय १८ वर्ष रा. रामनगर कन्हान या दोन आरोपीना अटक केली. 

        सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण,सचिन वेळेकर,हरिष सोनभद्रे,अमोल नागरे,अश्विन गजभिये,संदीप गेडाम सह पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.