पेंचखैरी येथील पाणी टंचाई संदर्भात शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन… — श्री.विशालजी बरबटे (रामटेक विधानसभा प्रमुख) यांच्या नेतृत्वात निवेदन सादर…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशीवनी :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसिल कार्यालय पारशिवणी येथे पेंच खैरी येथील पाणी टंचाई संदर्भात श्री.विशालजी बरबटे (रामटेक विधानसभा प्रमुख) यांच्या नेतृत्वात पारशिवनी तहसिल कार्यालयात मोर्चा नेऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

             सदर मोर्चा अंतर्गत तात्काळ पाण्याचा प्रश्न मार्गी लागावावे म्हणून तहसीलदार यांनी पाणी पुरवठा विभागाला फोन करून तातडीने मागणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

         या प्रसंगी वेळी प्रामुख्याने, कामगार सेना जिल्हाप्रमुख समीरजी मेश्राम,महीला सेनाजिल्हाप्रमुख दुर्गाताई कोचे,युवासेना जिल्हाप्रमुख लोकेशजी बावनकर,विधानसभा सघंटक रमेशजी तांदुळकर, पारशीवनी तालुका प्रमुख कैलासजी खंडार,तालुका संघटक गणेशजी मस्के,मौदा संपर्क प्रमुख नरेशजी भोंदे,पारशिवनी शहर प्रमुख सुनीलजी मस्के,संजयजी देसाई,सावनजी लोंढे,राजेंद्रजी पौनीकर,प्रशांतजी लकडकर,सन्नीजी पात्रे,अश्विनजी कुसुंबे,शांतारामजी ढोंगे,सुनीलजी दोनाडकर,विकासजी बेदरे,शंकरजी वाघमारे,अभीषेकजी कडु, रितेशजी चव्हाण,ज्ञानेश्वरजी उईके,संदिपजी पुरवले,किशोरजी चौधरी,अर्जुनजी वसु,विजयजी बडामे,राणीताई गजाम,पार्बताताई कांबळे,निर्मलाताई कोलीमारे,मंगलाताई निसार,रंजनाताई शाहारे,सरस्वताताई बेदरे,बनुताई ढोंगे,जयाताई वसाडे,मंदाताई गायकवाड,बेबीताई कोहळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तेथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.