नंदलाल पाटील कापगते यांची जयंती साजरी…

निलय झोडे

उपसंपादक

दखल न्यूज भारत

          नंदलाल पाटील कापगते विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय साकोली येथे शिक्षण सम्राट नंदलाल पाटील यांची 101 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

          कार्यक्रमाची सुरुवात नंदलाल पाटील व आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. 

           कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ.आर.बी.कापगते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापिका स्वाती गहाणे, डी.एस.बोरकर, एम.एम. कापगते, वाय.बी.कापगते, के. एम. कापगते व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

         नंदलाल पाटील यांनी साकोली तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व बहुजन समाजातील मुलांसाठी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे जाळे निर्माण केले असे मौलिक विचार प्राध्यापिका स्वाती गहाणे मॅडम यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर उपस्थित मुख्याध्यापिका आर.बी. कापगते यांनी देशाला मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी स्वाभिमानी ,कर्तव्यदक्ष, शुद्ध आणि निरोगी मनाची भावी पिढी हवी आहे, देशातील कोट्यावधी लोक निरक्षर असून अज्ञान, अंधकारात चाचपटत आहेत, त्या सर्वांना सुशिक्षित, सुसंस्कारी बनविण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे मुख्याध्यापिका आर. बी. कापगते यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी डी.एस. बोरकर, एम.एम.कापगते, डि.आर.देशमुख, सौ. सोनाली क-हाडे यांनी सुद्धा पाटील साहेबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत आपआपले मनोगत व्यक्त केले. 

          शिक्षण महर्षी नंदलाल पाटील व राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. 

         कार्यक्रमाचे संचालन आर. व्ही.दिघोरे यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय तुमसरे यांनी व्यक्त केले. 

           कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .