वैद्यकीय उपचाराकरिता डॉ. सतिश वारजूकर यांच्याकडून आर्थिक मदत..

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

        चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमुर तालुक्यातंर्गत मौजा आंबडी(बेगडे) येथील मोहन दामोधर खांडेकर यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाला असून त्या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले.

       त्यांचा पुढील उपचार नागपूर येथे सुरु असूण घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांनी तालुका काँग्रेस कमिटी चिमूर कार्यालय येथे उपचाराकरिता आर्थिक मिळण्याबाबत राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमुर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजुकर यांना अर्ज सादर केले होते.

       त्या अर्जाची दखल घेत आज डॉ.सतिश वारजुकर यांनी आंबडी बेगडे येथे जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेतली व आर्थिक मदत केली.

        यावेळी सोबत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी गजानन बुटके, चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ.विजय गावंडे, काँग्रेस नेते विवेक भाऊ कापसे, काँग्रेस कार्यकर्ते विजय शेंडे उपस्थित होते.