ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली- येथील पहाट मित्र मंडळ तर्फे वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रा. मनोहर मस्के यांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व मागर्दर्शन केले. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रामटेके यांनी आपल्या भाषणातून छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जीवनगाथा सांगितली. त्यांनी सांगितले राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली.
त्याचबरोबर डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर यांनी छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले कि, शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
या प्रसंगी कार्यक्रमाला अश्विन राउत, नरेश रामटेके, सुनील रोकडे, प्रफुल सूर्यवंशी, विजय लांजेवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मनोहर मस्के यांनी केले व आभार अशोक रंगारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भुरे, मारवाडे, सूर्यभान चेटूले, कागदराव रंगारी, अशोक रंगारी, दांडगे, रमेश कापगते, नारनवरे, बिसेन, अरुण चौहान, वामन कापगते, घोरमारे , शहारे, राउत, सेलोकर, मुनेश्वर साहेब, पटले, नंदेश्वर, डॉ. परशुरामकर साहेब व इतर सर्व पहाट मित्र मंडळ सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.