सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
राजेशाही असो की लोकशाही तिथे प्रमुख असणारी व्यक्ती समाजाच्या कल्याणाबद्दल काय बोलते, काय विचार करते आणि कोणते कायदे करते यावरून त्या व्यक्तीचे मोठेपण अधोरेखित होते. राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थानात जे कायदे, नियम केले,आदेश काढले,ते पहिल्यानंतर हा राजा माणूसपणाची उंची वाढविणारा होता हेच आजही अधोरेखित होते.असे अध्यक्षस्थानावरून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार बोलत होते.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दीन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम यांनी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे संचालन भुजंग आभारे यांनी केले तर आभार धनंजय गुरनुले यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.