उन्हाळ्याची सुट्टी, विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढीसाठी सांगितल्या गोष्टी… — सुवर्ण नगर जिल्हा परिषद शाळेत उपक्रम..

अश्विन बोदेले 

जिल्हा प्रतिनिधी 

दखल न्यूज भारत 

वडधा :- जिल्हा परिषद शाळा सुवर्ण नगर येथे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग होण्यास मदत झाली.

         इंग्रजी विषयाच्या दृष्टीने वाचन, लेखन, व संभाषण संदर्भाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. या उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी लीप फॉर वर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी गोष्टीचे वाचन, नवीन शब्द संग्रह व्हावे यासाठी जिल्हा परिषद शाळा सुवर्णनगर येथील उपक्रमशील शिक्षक पुंडलिक देशमुख यांच्या मार्गदर्शनात 50 दिवसांच्या “उन्हाळ्याची सुट्टी गोष्टींशी गट्टी ” अंतर्गत समर लायब्ररी प्रोग्रॅमच्या शुभारंभ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधन करण्यात आला होता.

         त्या 50 दिवसांच्या उपक्रमाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रल्हाद राऊत, उपाध्यक्ष निरंकला पेंदाम, शाळेचे मुख्याध्यापक बी. एस. मोहिते, लोमेश कलसार, पांडुरंग झरले, चंद्रकांत राऊत, पुंडलिक मेश्राम , राजेंद्र मेश्राम , खुशाल मडावी, आशा सरपे, वनिता कोटगले आदी उपस्थित होते. 

        समर लायब्ररी प्रोग्रॅम हा दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला उपक्रम आहे. एक वाचन , समजूतीचे कौशल्य आणि शब्द संग्रह वाढविण्याचे डिजिटल उपक्रम आहे.

        या 50 दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी शंभर गोष्टींचा अनुभव घेतला. या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या अभ्यासपूर्व ऍक्टिव्हिटीज आणि 1000 नवीन शब्दाचे वाचन सराव विद्यार्थ्यांना देण्यात आले.

         यामुळे विद्यार्थ्यांचे वाचन आणि गोष्टींची आवड वाढली. वाचनातील प्रवाह आणि समजुतीचे कौशल्य तसेच शब्द संग्रह आणि भाषा कौशल्य वृद्धिंगत होण्यास मदत झाली.

           यावेळी शाळेतील शिक्षक , पालक, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.